मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Floating City : जगातील पहिलं तरंगतं शहर, हॉटेल, मॉल आणि घरंही असणार पाण्यावर

Floating City : जगातील पहिलं तरंगतं शहर, हॉटेल, मॉल आणि घरंही असणार पाण्यावर

आता चक्क पाण्यावर तरंगणारं शहर (Floating City) वसवण्यात येत आहे. या ठिकाणी कोणत्या सुविधा असतील, काय खास असेल याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

आता चक्क पाण्यावर तरंगणारं शहर (Floating City) वसवण्यात येत आहे. या ठिकाणी कोणत्या सुविधा असतील, काय खास असेल याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

आता चक्क पाण्यावर तरंगणारं शहर (Floating City) वसवण्यात येत आहे. या ठिकाणी कोणत्या सुविधा असतील, काय खास असेल याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

मुंबई, 8 ऑगस्ट : विज्ञान आणि तंत्रज्ञान सध्या प्रचंड वेगाने प्रगती करत आहे. यामुळेच मनुष्य सध्या निसर्गाचे नियमही मोडीत काढत आहे. याचा परिणाम आपल्या राहण्यावरही झाला आहे. पूर्वी अशक्य वाटणाऱ्या ठिकाणीही मानवाने वसाहत स्थापन करून दाखवली आहे. पाण्याच्या खाली असो, किंवा अगदी अंतराळात... मनुष्य कुठंही वसाहत उभारण्यासाठी सज्ज झाला आहे.  आता मालदीव (Maldives) देशात आता चक्क पाण्यावर तरंगणारं शहर (Floating City) वसवण्यात येत आहे. या ठिकाणी कोणत्या सुविधा असतील, काय खास असेल याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 'आज तक'नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कुठं असेल शहर? मालदीव सरकार आणि डच डॉकलँड्स (Dutch Docklands) यांच्यामध्ये हे शहर (Maldives floating City) बनवण्याबाबत करार झाला आहे. या शहरातील घरांचा पहिला ब्लॉक याच महिन्यात तयार होईल असं सांगण्यात येत आहे. हा ब्लॉक तयार झाल्यानंतर त्याला समुद्रातील लगूनमध्ये (समुद्रातील तलाव) निश्चित जागी सोडण्यात येईल. मालदीवची राजधानी मालेपासून सुमारे 15 मिनिटं नावेतून प्रवास करून या ठिकाणी पोहोचता येईल. हे शहर माले एअरपोर्टपासूनही जवळ असणार आहे. जानेवारी 2023 पासून या फ्लोटिंग सिटीची (Floating City in Maldives) मोठ्या स्तरावर निर्मिती सुरू करण्यात येणार आहे. ही सिटी पूर्ण होण्यास चार ते पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 2027 साली जगातील हे पहिले तरंगणारं शहर (World’s first floating City) तयार होईल असं या शहराच्या निर्मात्यांनी सांगितलं. वयाच्या पन्नाशीतही दिसायचंय चिरतरुण? फॉलो करा ब्युटी टिप्स कोणत्या सुविधा असतील? हे शहर सुमारे 500 एकर जागेत वसवलं जाईल. युरोपातील नेदरलँड देशातील तरंगत्या घरांपासून (Netherlands floating houses) प्रेरणा घेत हे शहर उभारलं जाणार आहे. यामध्ये 5000 घरं असतील. ही सर्व घरं बसकी आणि सी-फेसिंग असतील. सोबतच हॉटेल, दुकानं, रेस्टॉरंट, अशा सुविधाही या ठिकाणी देण्यात येतील. वीजेसाठी या शहराचं स्वतःचं स्मार्ट ग्रीड असणार आहे. विशेष म्हणजे, मालदीव सरकारची या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यामुळे परदेशातील लोकही या ठिकाणी घर विकत घेऊन रेसिडेंट परमिट (Floating city house buy) मिळवू शकतात. दरवर्षी सुमारे 20 लाख पर्यटक मालदीवला भेट देतात. या शहरामुळे यांमध्ये वाढ होण्याची आशा सरकारने व्यक्त केली आहे. या शहरात येण्या-जाण्यासाठी कॅनल मार्ग, बोट ट्रान्सपोर्ट, क्रूज अशा विविध सुविधा देण्यात येतील. शहरातील सर्व दळणवळण व्यवस्था स्थानिक समुद्री सिस्टीमवर आधारित असेल. प्रवासाचं मुख्य साधन अर्थातच बोट असतील. प्रदूषण टाळण्यासाठी या ठिकाणी कार, बाईक अशा गोष्टी बॅन करण्यात येणार आहेत. केवळ सायकल, इलेक्ट्रिक कार्ट किंवा इलेक्ट्रिक स्कूटर यांना परवानगी देण्यात येईल. शहरात काही ठिकाणी चालण्यासाठी पांढऱ्या वाळूचे रस्तेही असतील. McDonald चं पार्सल नेणं प्रवाशाला पडलं महागात, विमानाच्या तिकिटापेक्षाही जास्त पैसे दंडातच गेले नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित समुद्रातील भरती, वातावरणातील बदल, समुद्राची पातळी वाढणं अशा विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी या शहराचे निर्माते अभ्यास करत आहेत. समुद्राच्या लाटांचा या शहरावर परिणाम होऊ नये, किंवा कमी परिणाम व्हावा यासाठी आजूबाजूला नैसर्गिक प्रवाळ (Natural Coral) तयार करण्यात येत आहे. या प्रवाळांना धडकून लाटा परत जातील, अशी योजना आहे. येत्या 100 वर्षांमध्ये समुद्रातील पाण्याचा स्तर भरपूर वाढणार आहे, याचा सामना हे शहर कसं करेल याबाबतही उपाययोजना करण्यात येत आहेत. इतर देशांना प्रेरणा या प्रकल्पापासून प्रेरणा घेत इतर देशांनीही अशा प्रकारचं शहर उभारण्याबाबत विचार करणं गरजेचं आहे. विशेषतः हवामान बदलामुळे (Climate Change) समुद्राची पातळी वाढत असताना कित्येक देशांमधील किनारी भागातील शहरं बुडण्याचा धोका आहे. एका अभ्यासात असं समोर आलं आहे, की जगातील कमीतकमी 33 किनारी शहरं दरवर्षी एक सेंटीमीटरहून अधिक पाण्याखाली जात आहेत. इंडोनेशिया देशाची राजधानी जकार्ता येत्या काही वर्षांमध्ये पाण्याखाली जाऊ शकते. यामुळे इंडोनेशिया आपली राजधानी जकार्तापासून 2000 किलोमीटर दूर असणाऱ्या बोर्नियो बेटावरील एका नवीन शहरात स्थलांतरित करत आहे. मेक्सिको सिटीदेखील दरवर्षी 50 सेंटीमीटर पाण्याखाली जात आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर दरवर्षी 0.8 सेंटीमीटर पाण्याखाली जात आहे. त्यामुळेच किनारी भागातील शहरांना वाचवण्यासाठी अशा प्रकारची उपाययोजना करण्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. बाबो! लोणच्याची फक्त एक फोड तब्बल 5 लाख रुपयांना; इतकं काय आहे त्यात खास पाहा जगभरातील समुद्राचा स्तर 1980 पासून आतापर्यंत आठ ते नऊ इंच वाढला आहे. त्यामुळे अ‍ॅमस्टरडॅम, बँकॉक, ह्युस्टन, ढाका, जकार्ता, मायामी, व्हेनिस अशी कित्येक शहरं येत्या काही वर्षांत समुद्राच्या पाण्यात बुडण्याचा धोका आहे. मालदीवमधील हा तरंगत्या शहराचा प्रयोग यशस्वी झाल्यास अनेक देशांना आपल्या किनारी शहरांचं पुनर्वसन करण्यास एक नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे.
First published:

Tags: Maldivs, World news

पुढील बातम्या