जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाकरेंच्या वर्मावरच घाव; इतिहासातील पहिली निवडणूक शिवसेनेचं नाव अन् चिन्हाशिवाय!

ठाकरेंच्या वर्मावरच घाव; इतिहासातील पहिली निवडणूक शिवसेनेचं नाव अन् चिन्हाशिवाय!

शिवसेनेनं ढाल-तलवार आणि इंजिन अशा चिन्हावर निवडणूक लढवली होती. नंतर शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह आलं.

शिवसेनेनं ढाल-तलवार आणि इंजिन अशा चिन्हावर निवडणूक लढवली होती. नंतर शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह आलं.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 ऑक्टोबर : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीआधीच शिंदे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटाला निवडणूक आयोगाला पर्याय द्यायचे आहे. त्यामुळे आता कोण कोणतं चिन्ह घेऊन लढतंय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाकरे गटाला काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठींबा शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा नाना पटोले यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही ठाकरे गटाला आपला पाठींबा दिला आहे. वाचा - शिवसेनेला खूप मोठा झटका, धनुष्यबाण गोठवलं, पक्षाचं नावही वापरता येणार नाही भाजपशी चर्चा करूनच रणनीती एकनाथ शिंदे गटाकडून या निवडणुकीत जोरदार ताकद लावण्याबाबत चर्चा झाली असली तरी ही जागा भाजप लढविणार असल्याने त्यांच्याशी चर्चा करूनच रणनीती ठरविली जाणार असल्याचे समजते. भाजपचे निवडणूक चिन्ह हे कमळ असल्याने त्याचा प्रचार करायची वेळ आल्यास शिंदे गटाने तो कसा करायचा, यावर जुजबी चर्चा झाल्याचे समजते. शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार म्हणून प्रचार करायचा तर त्यासाठी आयोगाकडून काही गोष्टी स्पष्ट करून घ्याव्या लागणार असल्याबाबतही गुरुवारी शिंदे गटात चर्चा झाल्याच समजते.

News18लोकमत
News18लोकमत

दोन्ही गटांकडे ह्या चिन्हांचे पर्याय.. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सद्याच्या घडीला 197 फ्री निवडणूक चिन्ह आहेत. शिवसेना उद्वव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी तीन चिन्हाचा पर्याय दिला जावू शकतो. आता दोन्ही गट कोणते चिन्ह घेतो हे सोमवारी समोर येणार आहे. दोन्ही त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात