मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shiv Sena Sada Sarvankar : शिवसेना, शिंदे गटात जोरदार राडा, बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप

Shiv Sena Sada Sarvankar : शिवसेना, शिंदे गटात जोरदार राडा, बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप

 सरवणकर यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आज पोलीस हे सरवणकरांच्या घरी पोहोचले

सरवणकर यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आज पोलीस हे सरवणकरांच्या घरी पोहोचले

राज्यात बंडखोर आमदार आणि शिवसैनिकांमध्ये वाद होताना दिसत आहेत. (Shiv Sena Sada Sarvankar) दरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेचा वाद आता हातघाईवर जाऊन पोहोचला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 11 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून मागच्या दोन महिन्यात शिंदे गट  विरूद्ध शिवसेना असा वाद सुरू आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यात बंडखोर आमदार आणि शिवसैनिकांमध्ये वाद होताना दिसत आहेत. (Shiv Sena Sada Sarvankar) दरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेचा वाद आता हातघाईवर जाऊन पोहोचला आहे. गणपती विसर्जनावरून शिंदे गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिक भिडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यामध्ये सरवणकर यांनी गोळीबार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याबाबत आमदार सदा सरवणकर यांनी मात्र आरोपांचे खंडण केले आहे.

मुंबईत मागच्या कित्येक तासांपासून गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघत आहेत. दरम्यान यावेळी किरकोळ वादावादीचे प्रसंगही घडले परंतु शिंदे गट आणि शिवसेना आमनेसामने आल्याने या वादाचे रुपांतर मोठ्या स्वरुपात होण्याची शक्यता होती. प्रभादेवीमध्ये शुक्रवारी शिंदे विरुद्ध शिवसेना गटात जोरदार राडा झाला. बंडखोर आमदार सदा सरवणकर विसर्जन मिरवणुकीवेळी मनसेच्या स्वागत कमानीमध्ये दिसून आले होते. यावरून वातावरण तंग होते परंतु कोणताही वाद झाला नव्हता.

हे ही वाचा : 'उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली', वरुण सरदेसाईंचा दावा

दरम्यान, हा वाद शनिवारी आणखी टोकाला गेला. शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. यावरून शिंदे गट विरूद्ध शिवसेना असा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे गंभीर आरोप करत म्हणाले कि, सदा सरवणकर यांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक पोलीस जखमी होता होता वाचल्याचंही ते म्हणाले. दादर पोलीस स्थानकाच्या आवारात सरवणकर यांनी गोळीबार केला, असा त्यांनी आरोप केला आहे.

आमदार सुनिल शिंदेंचा गंभीर आरोप

मागच्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेकडून गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी स्वागत कमान उभा केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वागत कक्ष उभारला गेला होता. पण शिंदे गटातील शाखा प्रमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे सहन झाले नाही, असा आरोप सुनील शिंदे यांनी केला आहे. त्यावरुनच हा वाद झाला. शिवसेनेच्या नगरसेवकांना शिंदे गटाचे कार्यकर्ते नको त्या भाषेत बोलत असतात. त्यांना सत्तेचा माज आला आहे. सोशल मीडियावरही आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्याचंही सुनील शिंदे म्हणाले. दरम्यान, यावेळी आपल्या असलेल्या पिस्तुलाचा गैरवापर सदा सरवणकर यांनी केल्याचंही सुनील शिंदे म्हणाले.

हे ही वाचा : तो शब्द कोणी फिरवला? शिवसेनेचा अमित शहांना रोखठोक सवाल

सदा सरवणकर काय म्हणाले

दरम्यान, सदा सरवणकर यांनी आपल्यावर करण्यात आलेले फेटाळून लावले. घरगुती वाद झाल्याचे त्यांनी म्हटले. त्यातून हा सगळा हाणामारीचा प्रकार घडल्याचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर म्हणाले.

First published:

Tags: Cm eknath shinde, Crime news, Mumbai, Shiv Sena (Political Party), Shiv sena workers, Shiv sena. शिवसेना, Uddhav Thackeray (Politician)