मुंबई, 07 ऑगस्ट : शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेले आमदार शहाजी बापू पाटील आणि उदय सामंत यांनी एकत्र येण्याचे भाष्य केलं आहे. ‘त्यांनी आधीही भूमिका घेतली असती तर ही वेळ आज आली नसती, अजूनही वेळ गेली नसून दरवाजे खुले आहे’, अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते सचिन अहिर (sachin ahir) यांनी दिली. महिना झाला तरी अजूनही विस्तार झाला नाही त्यामुळे शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे चलबिचल सुरू असल्याचे समोर आले आहे. अशाच दीपक केसरकर, शहाजी बापू पाटील आणि उदय सामंत यांनी शिवसेना आणि शिंदे गटाने एकत्र येण्याचे भाष्य केले आहे, त्यांच्या या विधानावर सचिन अहिर यांनी भाष्य केलं. ‘शहाजी पाटील, उदय सामंत यांची शिंदे-ठाकरे एकत्र येण्याची इच्छा आहे. त्यांना फार उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे. ही भूमिका जर आधी घेतली असती तर ही वेळ आली नसती. पक्षप्रमुखांचं नेतृत्व त्यांना मान्य असेल तर त्यांना आमचे नेहमीच दरवाजे उघडे आहेत, असं अहिर म्हणाले. (निलेश राणेंनी केसरकरांना दिली ड्रायव्हरच्या नोकरीची ऑफर, शिंदे गट-भाजपमध्ये वाद चिघळला) ‘दीपक केसरकर यांनी भूमिका मांडली आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतोय. आदित्य ठाकरे यांनी त्यांना काल काय बोलायला पाहिजे, हे त्यांनी चांगलं सांगितलं. ही जी विसंगती आहे ती आता हळूहळू सुरू होईल. नितेश राणे बोलले आहेत, आता निलेश राणे बोलायचे बाकी आहेत. हे सर्व झाल्यावर समजेल युतीमध्ये काय सुरू आहेत ते’ असंही अहिर म्हणाले. मंत्रालय नाव द्यायचं की सचिवालय नाव द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. संपूर्ण राज्यात पुराची परिस्थिती आहे. महिलांवर अत्याचार होत असताना कुठलीही प्रशासकीय धाक राहिलेली नाही आहे अनेक जीआर काढले आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. दिल्लीवारी किमान मंत्रिमंडळवारी होईल असं वाटलं पण ते देखील होत नाही आहे. ‘पालकमंत्री लागतात, मंत्री लागतात, प्रशासनावर वचक लागत असतो. आमची अपेक्षा होती किमान या दिल्लीवारीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. पण, कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही यात खोळंबा चाललेला आहे. आज सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडण्याचं काम यांनी केलं आहे. नसेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावं आमचं दोघांचं मंत्रिमंडळ आहे, मग आम्ही उत्तर देऊ, अशी टीकाही अहिर यांनी केली. (शिंदे गटात गोलमाल है भाई गोलमाल है, केसरकरांच्या प्रवक्ते पदावरून उदय सामंतांचे ट्वीस्टवाले ट्वीट) उदय सामंत दोन्ही बाजू ओळखून आहेत. उदय सामंत आणि केसरकर यांचे संबंध कसे आहेत हे मी सांगायची गरज नाही, असंही अहिर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.