मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वरळीतील दहीहांडीवरून सेना-भाजपमध्ये जुंपणार; BMC चा 2 कोटी खर्च पाण्यात?

वरळीतील दहीहांडीवरून सेना-भाजपमध्ये जुंपणार; BMC चा 2 कोटी खर्च पाण्यात?

मुंबईमध्ये यंदा दहीहंडीचा (Dahi Handi Celebration) उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यानिमित्ताने शिवसेनेला डिवचले.

मुंबईमध्ये यंदा दहीहंडीचा (Dahi Handi Celebration) उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यानिमित्ताने शिवसेनेला डिवचले.

मुंबईमध्ये यंदा दहीहंडीचा (Dahi Handi Celebration) उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यानिमित्ताने शिवसेनेला डिवचले.

मुंबई, 20 ऑगस्ट : कोरोनानंतर 2 वर्षांनी दहीहंडीचा जल्लोष आणि उत्साह राज्यभरात काल पाहायला मिळाला. मुंबई-ठाण्यात तर हा उत्साह अधिक होता. यातही राज्यात सत्तांतर झाल्यामुळे शिंदे गट-भाजप विरुद्ध शिवसेना असा वादही यानिमित्ताने पाहायला मिळाला. मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election) तोंडावर आल्यामुळे विशेषतः शिंदे गट आणि भाजपकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दहीहंडीच्या स्टेजवरुन शिवसेनेला डिवचलं. दरम्यान, वरळीतील जांभोरी मैदानातील दहीहांडीवरून सेना भाजपमध्ये जुंपणार असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

काय आहे प्रकरण?

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने दहीहंडीच्या कार्यक्रमातून आपलं शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. पण, आता वरळीतील जांभोरी मैदानातील दहीहांडीवरून सेना भाजपमध्ये जुंपणार असल्याचे दिसत आहे. भाजपच्या वरळीतील दहीहांडीमुळे मैदानातील रेनवॅाटर हार्वेस्टीग प्रकल्पाचे मोठे नुकसान झालं आहे. 2 कोटी रूपये खर्चून बीएमसीने काही महिन्यांपुर्वीच मैदानाच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन केले होते. मात्र, काल झालेल्या दहीहंडी कार्यक्रमामुळे मैदानाचा नास झालेला पाहायला मिळत आहे. या प्रकरणी शिवसेना आमदार सुनिल शिंदे आणि अभिजीत पाटील वरळी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

मुंबई महापालिकेतली भ्रष्टाचाराची हंडी भोडणार : फडणवीस

दहीहंडीनिमित्त मुंबईच्या (Mumbai Dahi Handi) रस्त्यांवर उत्साह दिसत होता, त्यातच महापालिका निवडणुका (BMC Election) तोंडावर आल्यामुळे नेते शक्तीप्रदर्शन करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुंबई आणि आसपासच्या भागातल्या वेगवेगळ्या दहीहंडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली, यातल्या भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या दहिसरमधल्या दहीहंडीमध्ये फडणवीस यांनी ठाकरेंना चॅलेंज केलं आहे. मुंबई महापालिकेतली भ्रष्टाचाराची हंडी फोडणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

थर रचताना तोल गेला आणि घात झाला, सहाव्या थरावरुन गोविंदा कोसळला

मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी

'तुम्ही दहीहंडी मधील हंडी फोडत आहात. आम्ही पण दीड महिन्यापूर्वी 50 थर लावून मोठी हंडी फोडली, त्यामुळे आज या राज्यात सर्व सामान्यांचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि भाजप-शिवसेना विचाराचे सरकार आज महाराष्ट्रात स्थापन झाले आहे. त्यामुळे येणारे सर्व सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करुया. आपली संस्कृती व परंपरा पुढे नेऊया. राज्य सर्व सामान्यांचे आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे सरकार आहे. सर्व सामान्यांना न्याय देणारे हे सरकार आहे, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं.

First published:

Tags: BMC, Devendra Fadnavis, Uddhav thacakrey