मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : शिवाजी नगर वार्डात जनता पुन्हा समाजवादी पक्षाला संधी देणार का? यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : शिवाजी नगर वार्डात जनता पुन्हा समाजवादी पक्षाला संधी देणार का? यावेळी काय होणार?

मुंबईतील वार्ड क्रमांक 149मध्ये मागच्या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

मुंबईतील वार्ड क्रमांक 149मध्ये मागच्या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

मुंबईतील वार्ड क्रमांक 149मध्ये मागच्या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 2 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 137मध्ये (Ward no. 137) मागच्या वेळी समाजवादी पक्षाने बाजी मारली होती. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी समाजवादी पक्षाच्या उमेदवार (Samajwadi Party Candidate) आयेशा रफिक शेख या निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमाक 137 बाबत. मुंबईतील वार्ड क्रमांक 149मध्ये मागच्या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यात समाजवादी पक्षाने बाजी मारल्याचे पाहायला मिळाले समाजवादी पक्षाच्या उमेदवार आयेशा रफिक शेख याठिकाणी विजयी झाल्या होत्या. त्यांना 8343 इतकी मते मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते - आयेशा रफिक शेख, समाजवादी पार्टी - 8343 संध्या महादेव आंबेकर, शिवसेना - 5695 मुरसल बिस्मिला जाकीर, काँग्रेस - 1125ॉ फरिया शौकत मोमी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 645 सरगर जयमाला कैलास, भाजप - 684 नोटा - 236 मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 227 वार्ड होते. नव्या रचनेनुसार यंदा 236 वार्ड करण्यात आले. मुंबई शहरात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ वार्ड वाढवण्यात आले. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका समजली जाते. त्यामुळे येथील निवडणुकीवर सर्वांचे लक्ष असते. वार्ड क्रमांक 137 चा विचार केला तर येथील जनता पुन्हा समाजवादी पक्षाला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे. राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यातील या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो, ते पाहणे महत्त्वाचे आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या