मुंबई 14 एप्रिल : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती आहे. त्यामुळे अभिवादन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेदेखील अभिवादन करण्यासाठी सकाळीच पोहोचले होते. याशिवाय एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेदेखील (Sameer Wankhede) चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गेले होते. समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर 8 जणांना अटक केली होती. आर्यन खानच्या अटकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. नवाब मलिकांनी (Nawab Malik) यावेळी वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. Nawab Malik Property Seized : नवाब मलिकांची संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई समीर वानखेडेंनी बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशीबी संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणांना आवाहन केलं की ‘बाबासाहेब आंबेडकरांना आपलं आदर्श माना आणि त्यांनी केलेला संघर्ष, सिद्धांत यांचं पालन करा’. यानंतर नवाब मलिकांची संपत्ती जप्त झाली आहे, याबाबत समीर वानखेडे यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, याबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला आणि हात जोडून ते तिथून निघून गेले. बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात ईडीने (ED) मोठी कारवाई केली. ईडीने नवाब मलिकांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतील (Mumbai) महत्त्वाची संपत्ती आणि उस्मानाबादेतील (Osmanabad) 148 एकर जमिनीचा समावेश आहे. ईडीने संबंधित कारवाई ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. Kirit Somaiya: आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा ईडीने नवाब मलिकांचे मुंबईतील पाच फ्लॅटवर जप्ती आणली आहे. यातील तीन फ्लॅट हे कुर्ला तर दोन फ्लॅट हे वांद्रे परिसरातील आहेत. ईडीने नवाब मलिक यांची उस्मानाबाद येथील 148 एकर शेतजमीनही ताब्यात घेतली आहे. ईडीने मलिकांच्या एकूण 9 मालमत्तांवर टाच मारली आहे. या प्रकरणाचा तपास ईडी आणि एनआयएकडून सुरु आहे. तसेच नवाब मलिकही सध्या अटकेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.