Home /News /mumbai /

Nawab Malik Property Seized : नवाब मलिकांची संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई

Nawab Malik Property Seized : नवाब मलिकांची संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई

नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने आज मोठी कारवाई केली आहे. ईडीने नवाब मलिकांची संपत्ती जप्त केली आहे.

मुंबई, 13 एप्रिल : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना झटका देणारी पुन्हा एक घटना समोर आली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने (ED) आज मोठी कारवाई केली आहे. ईडीने नवाब मलिकांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतील (Mumbai) महत्त्वाची संपत्ती आणि उस्मानाबादेतील (Osmanabad) 148 एकर जमिनीचा समावेश आहे. ईडीने संबंधित कारवाई ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने नवाब मलिकांचे मुंबईतील पाच फ्लॅटवर जप्ती आणली आहे. यातील तीन फ्लॅट हे कुर्ला तर दोन फ्लॅट हे वांद्रे परिसरातील आहेत. ईडीने नवाब मलिक यांची उस्मानाबाद येथील 148 एकर शेतजमीनही ताब्यात घेतली आहे. ईडीने मलिकांच्या एकूण 9 मालमत्तांवर टाच मारली आहे. ईडीची अद्यापही चौकशी सुरु आहे. पण ईडीने मलिकांच्या संपत्तीवर आणलेली जप्ती ही तात्पुरत्या स्वरुपाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास ईडी आणि एनआयएकडून सुरु आहे. तसेच नवाब मलिकही सध्या अटकेत आहेत. ईडीने प्रेसनोट जारी करत कारवाईबाबत माहिती दिली आहे. नवाब मलिक यांनी मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार करुन संबंधित संपत्ती मिळवली आहे. म्हणून या संपत्तीवर जप्ती आणल्याचं ईडीचं म्हणणं आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित जे आर्थिक व्यवहार झाले आहेत त्या व्यवहारातून ही संपत्ती घेतली गेली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड, कुर्ल्यातील कमर्शिअल युनिट, तसचे कुर्ल्यातील 3 फ्लॅट आणि वांद्रेतील 2 फ्लॅट, तसेच उस्मानाबादेतील 148 एकर शेतजमीनीवर जप्त आणण्यात आली आहे. (दोन वर्षांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल, अचानक मुख्यमंत्री येताच शासकीय कर्मचाऱ्यांची तारांबळ) ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मलिक जवळपास 11 कोटी 70 लाख रुपये या संपत्तीमधून कंट्रोल करत होते. त्यांची सॉरीडोस नावाची कंपनी आहे. मलिक इन्फ्रास्ट्रकचरच्या माध्यमातून पैसे देण्यात आले होते. ईडीने चौकशी केली असता संबंधित संपत्ती आणि पैशांचा संबंध हा दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत येतोय. तिथून हे सगळे पैसे आले असून त्यातून ही संपत्ती घेतली गेल्याचा दावा आणि आरोप ईडीने केला आहे. मरियम गोवाला नावाच्या महिलेची संपत्ती हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी जप्त केलेल्या संपत्तीविषयी निवडणुकीच्यावेळी प्रतिज्ञापत्रात माहिती दिली होती का हे अद्याप तपासलेलं नाहीय. पण उस्मानाबादची संपत्ती वगळता इतर सर्व संपत्ती त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दाखवल्या असाव्यात, अशी चर्चा सुरु आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या