Home /News /mumbai /

Kirit Somaiya: आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

Kirit Somaiya: आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

भाजप नेते किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या

Kirit Somaiya: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

मुंबई, 13 एप्रिल : आयएनएस विक्रांत (INS Vikrant) निधी अपहार प्रकरणात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली. किरीट सोमय्यांच्या या अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी झाली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अर्जावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने एक मोठा दिलासा त्यांना दिला आहे. सुनावणीपर्यंत अटक करु नये असं कोर्टाने म्हटलं आहे. किरीट सोमय्यांचे वकील अ‍ॅडवोकेट विवेकानंद गुप्ता यांनी सांगितले की, किरीट सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे. 18 तारखेपासून 4 दिवस EOW मध्ये चौकशीसाठी हजर रहावे लागेल. अटक झाल्यास 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात येईल. प्राथमिकदृष्ट्या 57 कोटी रुपये गोळा केले याचे पुरावे दिसत नाहीत. 2013 मधील हे प्रकर आहे मग 2022 मध्ये गुन्हा दाखल का झाला. या मुद्द्यांवर अंतरिम संरक्षण मिळाले आहे. प्राथमिकदृष्ट्या किरीट सोमय्या यांच्या विरोधात पुरावे आढळले नसल्याने त्यांना कोर्टाने हा अंतरिम दिलासा दिला आहे. उद्यापासून सलग चार दिवस सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे कोर्टाचे कामकाजही बंद असणार आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या यांच्यासाठी आजची सुनावणी खूपच महत्त्वाची होती. काय आहे प्रकरण? किरीट सौमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होतो. यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवली माहिती होती. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणी माजी सैनिक बबन भीमराव भोसले यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. किरीट सोमय्या, निल सोमय्या आणि त्यांचे इतर साथीदार याविरुद्ध अर्ज केला आहे. INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी, करोडोंचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. 2013 मध्ये खासदार असताना निधी गोळा केल्याचा आरोप सोमय्यांवर करण्यात आळा आहे. किरीट सोमय्या यांनी राष्ट्राची आणि जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे किरीट आणि निल सोमय्या या पितापूत्रांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी बबन भोसले यांनी केली आहे. भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका “आयएनएस विक्रांत’चा 60 कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. 1961 मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 60 कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Kirit Somaiya, Mumbai, Mumbai high court

पुढील बातम्या