जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद : प्राचार्याने चोरले कॉलेजमधील 10 लाख अन् खेळला ऑनलाईन रमी

औरंगाबाद : प्राचार्याने चोरले कॉलेजमधील 10 लाख अन् खेळला ऑनलाईन रमी

औरंगाबाद : प्राचार्याने चोरले कॉलेजमधील 10 लाख अन् खेळला ऑनलाईन रमी

निलेश नामदेव आरके असे अटकेतील प्राचार्याचे नाव आहे.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 8 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता औरंगाबाद येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील श्री साई इंजिनिअरिंग महाविद्यालयात चक्क प्राचार्यानेच दहा लाख रुपयांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - धक्कादायक बाब म्हणजे यातील 3 लाख रुपये प्राचार्याने ऑनलाईन रमीत घातले. तसेच चोरीच्या पैशांवरच दिवाळी साजरी केली. गुन्हे शाखेला त्याच्यावर संशय आल्याने पाळत ठेवली असता, 5 लाख 18 हजार रुपये घेऊन पळून जाताना प्राचार्याला पोलिसांनी आंबेडकर चौकात अटक केली. निलेश नामदेव आरके असे अटकेतील प्राचार्याचे नाव आहे. गुन्हे शाखेने प्राचार्याच्या ताब्यातून 5 लाख 18 हजारांची रोकड पोलिसांनी जप्त करुन एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.  हेही वाचा -  सरकार कधी कोसळणार? सत्तारांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंनी सांगितला मुहूर्त सख्ख्या भावानेच केली बहिणीच्या घरी लाखोंची चोरी मिरा रोडमध्ये लग्नकार्य असलेल्या ठिकाणी अचानक लाखो रुपये आणि दागिने चोरी झाल्याचे घटना घडली होती. आपल्या भाचीच्या लग्नासाठी केलेले दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाला होता. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकाने महिलेच्या सख्ख्या भावाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून लाखो रुपये आणि दागिन्यांसह मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पैसे आणि दागिने बघितल्यानंतर अनेकांची नियत बिघडते. अशाच या धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मीरा रोडमध्ये सख्ख्या भावानेच आपल्या भाचीच्या लग्नाचे पैसे आणि दागिने लुटून मामाच्या नात्याला कलंक फासला आहे. त्याने चोरी केलेले दागिने आणि रोकडची किंमत एकूण 26 लाख 60 हजार आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात