जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'हर हर महादेव' शो बंद करणे भोवणार? जितेंद्र आव्हाडांना पोलिसांची नोटीस

'हर हर महादेव' शो बंद करणे भोवणार? जितेंद्र आव्हाडांना पोलिसांची नोटीस

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले आणि त्यांनी हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले आणि त्यांनी हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले आणि त्यांनी हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 09 नोव्हेंबर : हर हर महादेव सिनेमावरून आता राजकीय वाद पेटला आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले आणि त्यांनी हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना नोटीस बजावली आहे. हर हर महादेव सिनेमा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मॉलमध्ये मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी कलम १४१ नुसार आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

वर्तकनगर पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. चौकशीला हजर रहा किंवा कोर्टापुढे हजर होण्याची प्रक्रिया असते, त्यासाठी सहकार्य करावे, अशी नोटीस बजावली आहे. (‘हर हर महादेव’ वादात मनसे कार्यकर्त्याला NCP कडून खळ्ळ-खट्याक, राज ठाकरे संतापले) या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह १०० NCP कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी ओळख पटवली आहे. जवळपास 50 NCP कार्यकर्त्यांना कलम 141 नुसार नोटीसा बजावली आहे. चौकशीला हजर रहावे तसंच तपासात सहकार्य करा अशा आशयाची नोटीस आहे. काय आहे प्रकरण? हरहर महादेव सिनेमामावरून राष्ट्रवादीचे आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले आणि त्यांनी हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. (जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनाला मनसेचं ‘हाऊसफूल’ प्रत्युत्तर, ठाण्यात ‘हर हर महादेव’ला तुफान गर्दी) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एका प्रेक्षकालाही मारहाण केली होती. या प्रेक्षकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला. फिर्यादी प्रेक्षक विजय दुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिनेमा बंद पाडल्यामुळे दुर्वे यांनी तिकीटाचे पैसे मागितले होते. दुर्वे हे मनसेचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये वाद निर्माण झाला. आव्हाडांसह 100 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल दरम्यान, विविआना मॉल येथे जितेंद्र आव्हाड यांनी बंद पडलेला चित्रपटात झालेल्या प्रकरणावरून ठाण्यातील वर्तक नगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहे. 141,143,146,149,323,504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 इत्यादी कलम लावण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात