मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Online Fraud : 200 रुपयांची थाळी पडली 8 लाखांना, मुंबईकर महिला 'जमतारा' scam ला बळी

Online Fraud : 200 रुपयांची थाळी पडली 8 लाखांना, मुंबईकर महिला 'जमतारा' scam ला बळी

मुंबईतील एका महिलेने ऑनलाईन महाराजा भोग थाळी मागवली आणि चक्क तिच्या खात्यातून 8 लाख 46 हजार रूपये उडाल्याची घटना समोर आली आहे.

मुंबईतील एका महिलेने ऑनलाईन महाराजा भोग थाळी मागवली आणि चक्क तिच्या खात्यातून 8 लाख 46 हजार रूपये उडाल्याची घटना समोर आली आहे.

मुंबईतील एका महिलेने ऑनलाईन महाराजा भोग थाळी मागवली आणि चक्क तिच्या खात्यातून 8 लाख 46 हजार रूपये उडाल्याची घटना समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 22 ऑक्टोबर : ऑनलाईन खरेदी करताना कित्येक जणांची फसवणूक होताना आपल्याला पहायला मिळाले आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी मुंबईत ऑनलाईन पद्धतीने केक मागवला अन् पेस्ट्री आल्याची घटना घडली होती. दरम्यान त्या व्यक्तीला तब्बल 1400 रुपये मोजावे लागले होते. ही घटना ताजी असतानाच मुंबईत आणखी एक ऑनलाईन फसवणूकीची घटना घडली आहे. मुंबईतील एका महिलेने ऑनलाईन महाराजा भोग थाळी मागवली आणि चक्क तिच्या खात्यातून 8 लाख 46 हजार रूपये उडाल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका महिलेने स्वस्त जेवण मिळत असल्याच्या भावनेतून ऑनलाईन पद्धतीने महाराजा भोग थाळी ऑर्डर केली. ही महाराजा थाळी 200 रुपयाला एकावर एक मोफत अशी ऑफर होती. यामुळे त्या महिलेने तातडीने त्यावर क्लिक केले आणि चक्क तिच्या अकाऊंटवरून 8 लाख 46 हजार रूपये उडाले. या फसव्या जाहिरातीमुळे महिलेला 8 लाख 46 हजार रूपयांना गंडा लागला. सदर महिलेने याची तक्रार वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये केली आहे.

हे ही वाचा : ठाण्यातील तरुणासोबत थायलंडमध्ये घडला धक्कादायक प्रकार, क्रिप्टो माफियांनी केले अपहरण

ऑनलाईन महाराजा भोग थाळी बुक करताना या लिंक मेसेजमध्ये रिमोट ॲक्सेस ॲप आणि रिमोट ॲक्सेस ॲपही डाऊनलोड झाले. या रिमोट ॲक्सेसला महिलेने परवानगी दिली आणि सायबर भामट्यांनी या महिलेला लाखोंचा चूना लावला. या 54 वर्षीय महिलेच्या खात्यातून सायबर भामट्याने अकाऊंट ॲक्सेस मिळाल्यानंतर 27 वेळा व्यवहार केला आणि तब्बल 8 लाख 46 हजार या महिलेला गमवावे लागले. दरम्यान या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेऊन ऑनलाईन व्यवहार करावे अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे.

मुंबईत आठवड्यात बऱ्याच घटना

नवी मुंबईतील घणसोली येथे राहणारे चंद्रकांत कवलगे यांनी ऑनलाईन केकची ऑर्डर केली होती. काही वेळाने त्यांच्याकडे स्विगी कपंनीच्या डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेला केक व पेस्ट्री घेऊन आला. मात्र ऑर्डर केलेल्या केकमध्ये व प्रत्यक्ष डिलिव्हरी घेऊन आलेल्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे चंद्रकांत कवलगे यांच्या निदर्शनास आले. हे सर्व पाहिल्यावर आपली फसवणूक झाली आहे असं समजल्यावर चंद्रकांत कवलगे यांनी डिलिव्हरी बॉय घेऊन आलेल्या साहित्यासह व्हिडीओ बनवला.

हे ही वाचा : ऑनलाईन मार्केटिंगच्या जाळ्यात तरुणाला ओढले, 2.84 लाख लुबाडले!

यासर्व प्रकारमुळे ऑनलाईन फसवणूक कशी केली जाते हे ही दिसून आले. मागवला केक आणि आली पेस्ट्री आणि ती ही चौदाशे रुपयांची..दरम्यान याबाबत कवलगे यांनी ऑनलाईन शॉपींगमध्ये कशी फसवणूक होते हे सांगितले. याचबरोबर ऑनलाईन शॉपींग अथवा कोणतीही खरेदी करताना त्याची खातरजमा केल्याशिवाय खरेदी करू नये असेही आवाहन कवलगे यांनी केले.

First published:

Tags: Crime news, Mumbai, Mumbai case, Mumbai News, Online fraud, Online shopping