औरंगाबाद, 22 ऑक्टोबर : ऑनलाईन मार्केटींग हा सध्याच्या काळातील ट्रेंडिग प्रकार आहे. कोणत्याही प्रॉडक्टची जाहिरात ही ऑफलाईन इतकीच ऑनलाईन करणे महत्त्वाचे आहे. ऑनलाईन मार्केटिंगमध्ये असलेल्या तेजीचा फायदा घेऊन या विश्वात गुन्हेगारही सक्रीय झाले आहेत. गरजू व्यक्तींना वेगवेगळी आकर्षक आमिष दाखवून त्याला जाळ्यात ओढायचे. त्यानंतर त्याची फसवणूक करायची हे प्रकार सध्या वारंवार उघड होत आहेत. औरंगाबाद मध्ये एका तरुणाची याच पद्धतीने फसवणूक करण्यात आली असून त्याला या व्यवहारात 2 लाख 84 हजार रुपयांचा फटका बसला आहे. काय आहे प्रकरण? औरंगाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवधूत दत्तात्रय फुटाणे (वय 27) असं या फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे. अवधूत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मुळचा रहिवाशी आहे. तो शिक्षणासाठी औरंगाबादमध्ये राहतो. अवधूतला व्हॉट्सअपवर ऑनलाईन प्रॉडक्ट विक्रीचा मेसेज आला होता. या मेसेजनुसार अवधूतनं सर्व माहिती भरून दिली. त्याला सुरुवातीला 100 रुपयांच्या वस्तूचे विक्री करण्याचे काम देण्यात आले. अवधूतनं ती वस्तू विकल्यानंतर त्याला तब्बल 194 रुपयांचे कमिशन मिळाले. त्यानंतर त्याला या पद्धतीनं आणखी काही वस्तू विक्रीसाठी देण्यात आले. त्याची विक्री झाल्यानंतर त्यावर कमिशनही मिळाले. अवघे 15 सेकंद आणि कारमधील साडेतीन लाख रूपये लंपास; नाशकातील अजब चोरीचा VIDEO अवधूतचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याला या व्यवसायात गुंतवणूक करायला भाग पाडले. त्यानं त्या प्रमाणे गुंतवणूक केली. त्याचबरोबर त्याची प्रॉडक्टची विक्रीही सुरू होती. कमिशन काढण्याच्या वेळी त्याला सुरूवातीला दोन दिवस थांबण्याचा सल्ला मिळाला. त्या मुदतीनंतर अवधूतने पुन्हा एकदा पैशांची विचारणा केल्यानंतर त्याला आणखी पैसे भरावे लागतील असे सांगण्यात आले. या सर्व प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याचे अवधूतला लक्षात आले. अवधूतने आपली फसवणूक झाल्याचे भावला सांगितले. त्यानंतर त्यांनी तातडीनं सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणात औरंगाबाद शहरातील सातारा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात सायबर गुन्हेगारांच्या विरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती सातारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र मळाळे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.