मुंबई, 4 फेब्रुवारी: मुंबईतील वाहतूक कोंडी (Mumbai Traffic Jam) ही आपल्या सर्वांसाठी काही नवीन नाहीये. तसेच पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि खड्ड्यांमुळे रस्त्यावर वाहनांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा हे चित्र सर्वांनीच पाहिलं असेल. पण मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट (divorce due to traffic in Mumbai) होत असल्याचा दावा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या अमृता फडणवीस ?
अमृता फडणवीस म्हणाल्या, जेव्हा मी काही बोलते तेव्हा तुम्ही हे विसरुन जा की देवेंद्र फडणवीस यांची बायको म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते. मला दिसतं की, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते, खड्ड्यांमुळे किती त्रास होतो. आज मुंबईत ट्रॅफिक जाम मुळे तीन टक्के घटस्फोट होतात हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे खड्ड्यांच्या विरोधात तुम्ही बोलणार नाहीत का?
वाचा : दोन दिवसांपासून ACB चे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे अचानक गायब; जालन्यात एकच खळबळ
भयानक जावईशोध - महापौर
अमृता फडणवीस यांनी केलेल्या या दाव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देत म्हटलं, ऐकावे ते नवलं... आज तर फारच मोठा जावईशोध लावला आहे की तीन टक्के घटस्फोट मुंबईतील वाहतूककोंडीमुळे होतात. त्यांच्यावर आता हसावं की रडावं? 100 टक्के मुंबईचे रस्ते अगदी गुळगुळीत आहेत असा दावा आम्ही कधीही केला नाही. पण जिधे जिथे खड्डे दिसले त्या त्या ठिकाणी दुरुस्ती केली.
कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवणारच असं सुरू आहे. अमृता फडणवीसांसह इतरानाही जो त्रास होत आहे तो खूपच वेगळा आहे. त्यामुळे मुंबईला नेहमीच बदनाम करण्याचं काम भाजप करते. मुंबईकर या करमणुकीच्या कामाला कंटाळले आहेत. अशा वक्तव्यांमुळे मुंबईची बदनामी होते. वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होतात हा जावईशोध भयानक आहे असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
बंडातात्या कराडकरांचा बोलविता धनी भाजप?
बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या, स्त्रियांवर टिपण्णी करणं आणि खासकरुन त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. आपल्या देशात हेच होतं. कुणी काही बोलतं आणि मग आंदोलनं होतात. ही मानसिगतेची बाब आहे. आपल्.याला विचार करायला हवा की काय बोलावं आणि काय बोलू नये.
भाजप आणि आरएसएस पुरोगामी आहे. स्त्रियांचा मान, सन्मान ठेवणं हे प्रथम कर्तव्य आहे आणि ते पार पाडतात. मी आरएसएस आणि भाजपच्या खूप जवळची आहे. मी राजकीय व्यक्ती नाहीये, मी तु्हाला एका शब्दात कसांगू शकते की स्त्रियांचा सर्वाधिक कुणी आदर करत असेल तर आरएसएस करतं असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amruta fadnavis, BMC, Divorce, Mumbai, Mumbai News, Traffic, Traffic signal