मुंबई, 21 ऑक्टोबर : मागच्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात घरफोड्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याने पोलिसांची डोकेदुखी झाली होती. दरम्यान दिवसा झोपणे आणि रात्री खेळ करणारा एक चोरटा नालासोपारा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून या चोरट्याने मोठ्या घरफोड्या केल्या होत्या यामुळे पोलिसांसमोर याला पकडण्याचे आव्हान निर्माण झाले होते. त्याच्याकडून सात गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. सोन्याचे मौल्यवान दागिने, मोबाईल, यासारख्या वस्तू त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत पुढील तपास नालासोपारा पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिमेकडील घराच्या खालीबसून फोनवर बोलत असताना अज्ञात इसमाने पाठीमागून एका महिलेला वार करत मौल्यवान वस्तू काढून घेऊन पसार झाला होता. दरम्यान त्या महिलेला चोरट्याने मीटर रूममध्ये बंदिस्त ठेवून लूट केली होती. यावर सलमा मेहतर यांनी याप्रकरणी 21 ऑगस्ट 2022 रोजी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा : चोरट्यांनी ग्राहकाचाच केला ‘पोपट’, पुण्यातील तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार
नालासोपारातील वाढत्या घरफोड्यांची दखल घेऊन पोलीस आयुक्त सदानंद दाते, अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे, राहुल सोनवणे यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून शिफत हबीब शेख (वय 19) याने हा गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी पोलीस तपासात समोर आले.
शिफत पश्चिम बंगालचा असून तो आपल्या बहिणीकडे राहत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती. तो दिवसा संपूर्ण दिवस झोपून राहायचा आणि रात्री घर फोड्या करायचा या चोरट्याने नालासोपाऱ्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मात्र या चोरी केलेल्या दागिन्यांना विकण्यासाठी जेव्हा जाणार होता. तेव्हाच पोलिसांना खबर लागली आणि पोलिसांनी त्याचा गाशा गुंडाळला.
हे ही वाचा : YouTube व्हिडिओ पाहून घरीच प्रसूती, अल्पवयीन मुलीने बाळाला दुसऱ्या मजल्याहून फेकलं, पुण्यातील घटना
या चोरीनंतर त्याने लागोपाठ सहा घर फोड्या केल्या होत्या. या गुन्ह्यातील तब्बल 90% मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यामुळे ज्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती त्यांना त्यांच्या वस्तू मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत नालासोपारा पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे.