पुणे 17 ऑक्टोबर : पुण्यातील कोंडवे धावडे परिसरामधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने एका बाळाला घरातच जन्म दिला. मिळालेल्या माहितीनुसार, युट्यूबवर व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलीने स्वतःच स्वतःची प्रसूती केली. त्यानंतर नवजात बाळाला फेकून दिल्याचं समोर आलं आहे. घरातच बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला दुसऱ्या मजल्यावरून टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणीच्या घरी येऊन तिच्याच आजीला संपवलं; भंडाऱ्यातील अल्पवयीन मुलीचं हादरवणारं कांड या घटनेची आता राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी पोलिसांना त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच सदर अल्पवयीन मुलगी गरोदर असताना ती तपासणीसाठी गेली तेव्हा तिची माहिती डॉक्टरांनी संबंधित यंत्रणेला दिली आहे की नाही? याची जबाबदारी निश्चित करून डॉक्टरांवरही कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस यंत्रणेला दिले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
पुण्यातील कोंडवे धावडे परिसरामध्ये अल्पवयीन सतरा वर्षीय मुलीने एका मुलाला घरातच जन्म दिल्यानंतर त्याला दुसऱ्या मजल्यावरून टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याची राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी1/3 pic.twitter.com/IpjuI9duwT
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 16, 2022
रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्म दिलेले दोन दिवसीय नवजात अर्भक ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. बाळाच्या तब्येतीवर आयोग जातीने लक्ष देत आहे. नवजात बाळ सोसायटीच्या आवारात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर उपचारासाठी पोलीस या बाळाला रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. रुग्णालयाच्या छतावर आढळले 200 कुजलेले मृतदेह; शरीराचे अवयव अन् कपडेही गायब, पाकिस्तानात खळबळ बाळाला जन्म दिलेल्या अल्पवयीन मुलीवरही एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार, हे बाळ तिनेच दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकलं होतं. तिने युट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतःच स्वतःची प्रसूती केल्याचीही माहिती दिली. या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. चार-पाच महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी आणि तिची आई एका खासगी रुग्णालयात गेली होती. त्यावेळी डॉक्टरांनी मुलगी गरोदर असण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, दोघींनीही याकडे दुर्लक्ष केलं होतं, अशी माहितीही समोर आली आहे.