विशाल पाटील, प्रतिनिधी मुंबई, 2 फेब्रुवारी: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची मुंबईत (MNS leaders meeting in Mumbai) एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे नेते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आगामी मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित कऱण्यात आली होती. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. युतीच्या चर्चेत पडू नका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, युतीच्या चर्चेत पडू नका. तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा. तुमच्या मनात विषय येत असेल युतीच काय होणार?, युती होईल की नाही ते पुढे बघू तुमची स्वतंत्र लढण्याची तयारी असली पाहिजे. महानगरपालिका निवडणुकांसाठी स्वतंत्र्य लढण्याच्या तयारीत रहा युती ही गोष्टीमध्ये अडकू नका. मनसेची बैठक पार पडल्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले कि, निवडणुकीच्या दिवशी व्यवस्थापन कसं करायचं आहे या संदर्भातील कमिटी स्थापन करणार. उमेदवारांची नेमणूक कशी करणार या संदर्भातील चर्चा बैठकीत झाली. कमिटी स्थापन करून बैठका घेणार आहेत. गटअध्यक्ष यांच्या बैठक घेणार, 15 फेब्रुवारी पर्यंत अहवाल देणार आहोत. वाचा : मुंबईत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार राडा युती बाबात पढू नका असं सांगितलंय, स्वतंत्र्य लढण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेने वॉर्ड रचना जरी बदलली तरी लोकांची नाराजी बदलणार नाही. शिवसेने सोबत मराठी माणसं, हिंदू लोकं आहेत सोबत? कितीही वॉर्ड रचना बदलल्या तरी आजचं मरण उद्यावर ढकलंत आहेत पण मरण अटळ आहे असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. भाजपचा एकला चलोचा नारा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ‘ मिशन मुंबई ’ म्हणत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. 25 जानेवारीला भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपच्या युतीची शक्यता मावळली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती. पण भाजपच्या या बैठकीत मनसेसोबत युतीची चर्चा करण्यात आली नाही. मनसेबरोबर युती करण्याबाबत भाजपच्या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये मनसे पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत सोबत घ्यावं का? या भोवतीचा मुद्दा चर्चेला आला पण स्वबळावर महापालिका निवडणूक लढवू आणि एक हाती सत्ता आणण्याचा प्रयत्न करा अशा सूचना, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.