Home /News /mumbai /

मनसेला टाळी नाहीच! मुंबई पालिका निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा नवीन प्लॅन

मनसेला टाळी नाहीच! मुंबई पालिका निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा नवीन प्लॅन

. मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये मनसे पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत सोबत घ्यावं का? या भोवतीचा मुद्दा चर्चेला आला पण

. मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये मनसे पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत सोबत घ्यावं का? या भोवतीचा मुद्दा चर्चेला आला पण

. मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये मनसे पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत सोबत घ्यावं का? या भोवतीचा मुद्दा चर्चेला आला पण

    मुंबई, 25 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (mumbai municipal corporation ) तोंडावर भाजपने 'मिशन मुंबई' म्हणत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. मनसेला (mns) सोबत घेण्याबाबत चर्चांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी नकार दिला आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपच्या युतीची शक्यता मावळली आहे. मुंबई महापालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक पार पडली. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती. पण या बैठकीत मनसेसोबत युतीची चर्चा करण्यात आली नाही. (Office Tips: ऑफिसमध्ये तुमचीच असेल हवा; मिटींग्समध्ये 'या' गोष्टींचं करा पालन) मनसेबरोबर युती करण्याबाबत भाजपच्या आजच्या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये मनसे पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत सोबत घ्यावं का? या भोवतीचा मुद्दा चर्चेला आला पण  स्वबळावर महापालिका निवडणूक लढवू आणि एक हाती सत्ता आणण्याचा प्रयत्न करा अशा सूचना, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात. तसंच,  भविष्यात शिवसेनेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना दिले आहे. (दुष्काळात तेरावा महिना, IPL मुळे पुन्हा बसणार पाकिस्तानला धक्का!) याआधीही मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा रंगली होती. खुद्द देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. ही सदिच्छा भेट जरी असली तरी राजकीय दृष्ट्या भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेला नवे वळण ठरले होते. एवढंच नाहीतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊन युतीच्या चर्चेची केली होती. त्यानंतर पाटील यांनी जाहीरपणे युतीचे संकेतही दिले होते. पण, आज भाजपच्या बैठकीत नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, MNS

    पुढील बातम्या