मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चंदीगड MMS लिक प्रकरणाचं मुंबई कनेक्शन? तपासात मोठी माहिती उघड

चंदीगड MMS लिक प्रकरणाचं मुंबई कनेक्शन? तपासात मोठी माहिती उघड

चंदीगड एमएमएस लीक प्रकरणाचं मुंबई आणि गुजरात कनेक्शन आता समोर आलं आहे. या प्रकरणात, चौथ्या व्यक्तीला कधीही अटक केली जाऊ शकते. (Chandigarh University Leak Video)

चंदीगड एमएमएस लीक प्रकरणाचं मुंबई आणि गुजरात कनेक्शन आता समोर आलं आहे. या प्रकरणात, चौथ्या व्यक्तीला कधीही अटक केली जाऊ शकते. (Chandigarh University Leak Video)

चंदीगड एमएमएस लीक प्रकरणाचं मुंबई आणि गुजरात कनेक्शन आता समोर आलं आहे. या प्रकरणात, चौथ्या व्यक्तीला कधीही अटक केली जाऊ शकते. (Chandigarh University Leak Video)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 20 सप्टेंबर : चंदीगड एमएमएस लीक प्रकरणाचं मुंबई आणि गुजरात कनेक्शन आता समोर आलं आहे. या प्रकरणात, चौथ्या व्यक्तीला कधीही अटक केली जाऊ शकते. आरोपी तरुणीकडे एक डिव्हाईस सापडलं असून ते तपासासाठी पाठवण्यात आलं आहे. या डिव्हाइसमध्ये व्हिडिओ सेव्ह केले होते. सोमवारी चंदीगड विद्यापीठातील मोहालीच्या गर्ल्स हॉस्टेल एमएमएस प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका विद्यार्थिनीला आणि दोन तरुणांना न्यायालयात हजर करण्यात आलं.

न्यायालयाने तिघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रिमांडनंतर एसआयटीने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सोमवारी सायंकाळपासून आरोपींची चौकशी सुरू आहे. एसआयटीशी संलग्न डीएसपीनेही कॅम्पसला भेट दिली, जिथे त्यांनी चौकशी केली. आता या प्रकरणाचं कनेक्शन मुंबई आणि गुजरातशीही जोडलं गेल्याचं समोर येत आहे.

चंडीगडमध्ये MMS लिक प्रकरण! अशा परिस्थितीत महिलांचे कायदे आणि अधिकार माहितीय का?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या मोबाईलवर गुजरात आणि मुंबईतूनही फोन आले आहेत. त्यांचा त्यांच्याशी काय संबंध आहे, याची एसआयटी टीम चौकशी करत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात चौथा व्यक्तीही आहे, जो मुलीला ब्लॅकमेल करत होता. त्याला अद्याप अटक व्हायची आहे. त्याला पकडण्यासाठी पथक रवाना झालं आहे.

आरोपी विद्यार्थिनी जे व्हिडिओ आपला प्रियकर सनीला पाठवायची, ते व्हिडिओ सनी एका एका डिव्हाईसमध्ये साठवायचा. ते डिव्हाइस सनीकडून जप्त करण्यात आलं असून ते फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणी एसएसपी विवेक शील सोनी यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की आतापर्यंत फक्त एकच व्हिडिओ समोर आला आहे जो आरोपीचाच आहे. याशिवाय अन्य कोणताही व्हिडिओ तपासात समोर आलेला नाही.

हॉस्टेलमधील तरुणींचे अंघोळ करतानाचे Video लिक! तरुणाच्या सांगण्यावरुन तरुणी.. इनसाइड स्टोरी

मोहालीच्या एसएसपींच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेल्या विद्यार्थिनीने चौकशीदरम्यान सांगितलं की, तिने इतर कोणत्याही विद्यार्थ्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नाही. तिने फक्त स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवला. आरोपीचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

First published:

Tags: Chandigarh, MMS