मराठी बातम्या /बातम्या /explainer /

चंडीगडमध्ये MMS लिक प्रकरण! अशा परिस्थितीत महिलांचे कायदे आणि अधिकार माहितीय का?

चंडीगडमध्ये MMS लिक प्रकरण! अशा परिस्थितीत महिलांचे कायदे आणि अधिकार माहितीय का?

चंदीगडमधील एका विद्यापीठात काही विद्यार्थिनींचे गुपचूप आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. यात महिलांचे अधिकार काय आहेत आणि कायदा काय म्हणतो?

चंदीगडमधील एका विद्यापीठात काही विद्यार्थिनींचे गुपचूप आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. यात महिलांचे अधिकार काय आहेत आणि कायदा काय म्हणतो?

चंदीगडमधील एका विद्यापीठात काही विद्यार्थिनींचे गुपचूप आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. यात महिलांचे अधिकार काय आहेत आणि कायदा काय म्हणतो?

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

चंदीगड, 19 सप्टेंबर : चंडीगड विद्यापीठात (Chandigarh University) शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याची बातमी समोर आल्यानंतर शनिवारपासून जोरदार विरोध प्रदर्शनं सुरू आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोलीस आणि प्रशासनाने ही बाब फेटाळून लावली. या प्रकरणी एक विद्यार्थिनी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली असून, आयपीसी कलम 354 सी आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकरणात पीडित पक्षाचे अधिकार काय आहेत आणि कायद्याच्या कलमांमध्ये काय तरतुदी आहेत हे जाणून घेऊयात.

जेव्हा एखाद्या महिलेचा विनयभंग होतो आणि तिच्याबाबत असं आक्षेपार्ह कृत्य केलं जातं, ज्यामुळे तिला गंभीर दुखापत होते, तेव्हा ते कृत्य करणाऱ्याविरोधात कलम 354C अंतर्गत गुन्हा नोंदवला जातो. हा गंभीर गुन्हा मानला जातो. यामध्ये एक ते पाच वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षाच नाही, तर आर्थिक दंडाचीही तरतूद आहे. हा गुन्हा माफीस पात्र नाही.

आयटी कायद्यात अनेक कलमं असली तरीही या प्रकरणात काही कलमं थेट लागू होतात, ज्यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करून कारवाई करण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यातील काही बाबी खालीलप्रमाणे

- गोपनीयतेच्या भंगासाठी शिक्षेची तरतूद - कलम 66E

- आक्षेपार्ह माहितीच्या प्रसिद्ध करण्याशी संबंधित तरतुदी - कलम 67

- इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे लैंगिक किंवा अश्लील माहिती प्रसिद्ध किंवा प्रसारित करण्यासाठी शिक्षेची तरतूद - कलम 67A

- इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे अशा आक्षेपार्ह सामग्रीची प्रसिद्धी किंवा प्रसारण ज्यामध्ये मुलं अश्लील अवस्थेत दाखवली जातात - कलम 67B

- परस्पर विश्वास आणि गोपनीयताभंगाशी संबंधित तरतुदी - कलम 72A

मोठ्या प्रमाणात बळी पडतात महिला

आपल्या देशात महिला रोजच अशा प्रकारच्या छळाला मोठ्या प्रमाणावर बळी पडतात. अनेक वेळा महिलांना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवून त्यांचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जातात. अनेकदा त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ त्यांना न कळवता लपून चित्रित केले जातात, त्यांनाही त्याची माहिती नसते. साधारणपणे हे स्पाय कॅमेऱ्यांच्या मदतीने केलं जातं आणि नंतर व्हिडिओ व्हायरल (Video Viral) केला जातो. काहीवेळा त्यांचे नॉर्मल फोटोही मॉर्फ करून व्हायरल केले जातात. असे फोटो व्हायरल करून महिलांना ब्लॅकमेल केलं जातं. सार्वजनिकरित्या बदनामीच्या भीतीने महिला आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना या गोष्टी सांगण्यास घाबरतात. परंतु जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा त्यांना असे अधिकार आहेत, की त्या कायद्याच्या मदतीने अशा परिस्थितीचा सामना करू शकतात.

वाचा - हॉस्टेलमधील तरुणींचे अंघोळ करतानाचे Video लिक! तरुणाच्या सांगण्यावरुन तरुणी..

महिलांना कोणते अधिकार आहेत?

1. महिला बीभत्स चित्रण, सादरीकरण प्रतिबंधक कायदा 1986

जेव्हा एखाद्या महिलेचा फोटो एडिट करून तो अश्लील बनवला जातो आणि सोशल मीडियावर व्हायरल केला जातो, अशा गुन्ह्यांवर महिला बीभत्स चित्रण, सादरीकरण प्रतिबंधक कायदा, 1986 च्या कलम 6 अंतर्गत कारवाई केली जाते.

2. आयटी कायदा, 2000

कोणत्याही व्यक्तीचे वैयक्तिक फोटो त्याच्या संमतीशिवाय कॅप्चर करणं, प्रसारित करणं, प्रसिद्ध करणं हा IT कायद्याच्या कलम 66A अन्वये गुन्हा आहे. या कायद्यानुसार या गुन्ह्यासाठी कारावासाची आणि तीन लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावरून एखाद्या महिलेचे अश्लील फोटो किंवा व्हिडिओ पाठवले तर त्याच्यावर कलम 67 अंतर्गत कारवाई केली जाते. या अंतर्गत चंडीगडमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3.भारतीय दंड संहिता, 1860

जर एखाद्या महिलेला तिच्या अश्लील फोटो किंवा व्हिडिओच्या आधारे दबाव टाकून सेक्स करण्यास भाग पाडलं गेलं तर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला जातो. यामध्ये आयपीसी कलम 354 (ए) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये तीन वर्षांपर्यंत सश्रम कारावास किंवा दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

- जर एखाद्या महिलेचे आंघोळ करताना, कपडे बदलताना किंवा नग्न अवस्थेत फोटो काढले गेले असतील, तर ती गुन्हेगारी कृती आहे. हे कलम 354C च्या श्रेणीत येतं. चंडीगड व्हिडिओ क्लिप प्रकरणात पोलिसांनी याअंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. यामध्ये 5 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडही होऊ शकतो.

- जर एखाद्या महिलेने तिचा वैयक्तिक फोटो काढण्यास संमती दिली असेल परंतु लोकांमध्ये प्रसारित करण्यास परवानगी दिली नसेल आणि तरीही जर ते प्रसारित केले गेले तर तसं करणारी व्यक्ती गुन्हेगार ठरेल आणि तिच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

4. पॉक्सो कायदा, 2012

18 वर्षांखालील मुलीसोबत असा गुन्हा घडल्यास हा गुन्हा पॉस्को कायद्यांतर्गत नोंदवला जातो. या कायद्यात चाइल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित तरतुदीही कडक करण्यात आल्या आहेत. हा कायदा अतिशय कठोर असून मुलींच्या संरक्षणाशी संबंधित आहे.

अशा गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा?

महिलांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

- तुम्हाला अशा धमक्या आल्या तर कुटुंब आणि मित्रांना नक्की सांगा.

- ऑनलाइन डेटिंग अॅप्स आणि सेक्स चॅटपासून दूर राहा.

- कोणालाही तुमचे खासगी फोटो काढू देऊ नका.

- सार्वजनिक ठिकाणं, हॉटेल्स, स्वच्छतागृहं इत्यादी ठिकाणी थांबण्यापूर्वी त्यामध्ये स्पाय कॅमेरा नाही ना हे तपासा.

- या गुन्ह्यापासून बचावासाठी तुम्हाला एफआयआर दाखल करण्याचा अधिकार आहे. हे गोपनीय आहे. यामध्ये कोणतंही माध्यम तुमचें नाव आणि ओळख उघड करू शकत नाही आणि पोलिसांनाही तुमची ओळख उघड करता येत नाही.

तक्रार कुठे आणि कशी करायची?

- असा काहीही प्रकार घडल्यास पुरावे गोळा करा.

- ज्यामध्ये संबंधित व्यक्तीची ओळख, फेसबुक आयडी, व्हॉट्सअॅप यांचा स्क्रीन शॉट घ्या. ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील असतील तर तीदेखील जमा करा.

संबंधित व्यक्तीचे मेसेज, ई-मेल, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक चॅट्सहेही अशा प्रकरणांमध्ये भक्कम पुरावे असू शकतात.

सायबर सेलमध्ये करता येईल तक्रार

सायबर गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने प्रत्येक शहरात सायबर सेलची स्थापना केली आहे. तिथे तुम्ही अशा गुन्ह्यांची तक्रार नोंदवू शकता. स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवता येते, तसंच तुम्ही ऑनलाइन तक्रारही करू शकता.

चंडीगडसारखा प्रकार खरं तर कुठे घडू नये, पण जर तशी परिस्थिती उद्भवली तर कायद्याच्या आधाराने महिला तक्रार नोंदवू शकतात.

First published:

Tags: Crime, Law