चंदीगड, 18 सप्टेंबर : शनिवारी रात्री उशिरा मोहालीतील एका खाजगी विद्यापीठात 60 मुलींच्या वसतिगृहातील मुली अंघोळ करतानाचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याची माहिती मिळाल्यावर गोंधळ उडाला. याप्रकरणी वसतिगृहातीलच एका विद्यार्थीनीला आरोपी करण्यात आले आहे. ती विद्यार्थिनींचा व्हिडीओ बनवून शिमल्यातील एका तरुणाला पाठवायची आणि तो इंटरनेटवर व्हायरल करायचा. तरुणही या विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे बोलले जात आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, न्यूज18ला एक व्हिडिओ मिळाला आहे, ज्यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी या संपूर्ण घटनेबद्दल सांगत आहेत. प्रकरण संवेदनशील असल्याने आम्ही तो व्हिडिओ सार्वजनिक करू शकत नाही. मात्र, विद्यार्थिनींच्या संभाषणाचा सारांश देत आहोत. तुम्हाला व्हिडिओ बनवताना पाहिलंय… हॉस्टेलच्या एका खोलीबाहेर अनेक मुली जमल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक विद्यार्थीनी म्हणतायेत, ‘दीदी कुछ हुआ है यार…एक्चुअली इश्यू झाला आहे. सर्व मुली थोड्या अस्वस्थपणे धावत आहेत. बाथरूमचे गेट बंद होते आणि कोणीतरी तुम्हाला व्हिडिओ बनवताना पाहिले. सर्वांनी पाहिले आहे. तुम्ही सांगा अखेर काय झालं…?, या मुली त्या विद्यार्थीनीशी बोलत आहेत, जिच्यावर व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. आरोपी तरुणीला मुली सांगत आहेत, सगळे घाबरले आहेत. काय कारवाई करावी हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही व्हिडीओ बनवला आहे…? यावर आरोपी मुलीने कबूल केले की तिने व्हिडिओ बनवला आहे. एका तरुणाच्या सांगण्यावरून तिने हे कृत्य केल्याचे तिचे म्हणणे आहे.
#WATCH | It's a matter of a video being shot by a girl student & circulated. FIR has been registered in the matter & accused is arrested. No death reported related to this incident. As per medical records, no attempt (to commit suicide) is reported: SSP Mohali Vivek Soni pic.twitter.com/pkeL70MYP8
— ANI (@ANI) September 18, 2022
एक मुलगी धक्क्याने बेशुद्ध या प्रकरणातील आरोपींना सोडले जाणार नाही, असे पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत बैंस यांनी म्हटले आहे. मोहाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 354 आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुण आणि तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्याचे समजल्यानंतर 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही सांगण्यात आले. मात्र, मोहालीचे एसएसपी विवेक सोनी यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्यांनी एएनआयला सांगितले की वैद्यकीय अहवालात कोणाच्याही आत्महत्येच्या प्रयत्नाची पुष्टी नाही. त्याच वेळी, विद्यापीठ व्यवस्थापनाने न्यूज 18 शी केलेल्या संवादात सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर एक मुलगी धक्क्याने बेशुद्ध झाली होती, तिला रुग्णालयात नेण्यात आले, आता ती बरी आहे.
वाचा - लहानपणी काकानेच केलेला अत्याचार; या कारणामुळे 35 वर्षीय विवाहितेची 28 वर्षांनंतर पोलिसांत धाव
तरुणीकडून गुन्ह्याची कबुली पण.. दुसऱ्या व्हिडिओमध्ये महिला वसतिगृहाची वॉर्डन आरोपी मुलीची चौकशी करताना दिसत आहे. तिने हे व्हिडिओ एका मुलाला पाठवल्याचे तिने मान्य केले आहे. त्या मुलाला ओळखत नसल्याचे विद्यार्थिनीचे म्हणणे आहे. वॉर्डनने अनेकवेळा विचारणा करूनही आरोपी मुलगी तिचे त्या मुलाशी काय नाते आहे, तो कोण आहे हे सांगत नाही. वॉर्डनने तिला विचारले की ती किती दिवसांपासून व्हिडिओ बनवत आहे, या प्रश्नाचे उत्तरही आरोपी विद्यार्थीनी देत नाही. चूक झाली आहे आणि भविष्यात करणार नाही असे ती वारंवार सांगते. पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी खासगी विद्यापीठाला भेट देऊन विद्यार्थिनींशी बोलून याप्रकरणी कठोर कारवाईचे आश्वासन दिले. चूक झाली आहे आणि भविष्यात करणार नाही असे ती वारंवार सांगते. पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी खासगी विद्यापीठाला भेट देऊन विद्यार्थिनींशी बोलून याप्रकरणी कठोर कारवाईचे आश्वासन दिले.