जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mohit Kamboj vs NCP : मोहीत कंबोज यांच्या रडारवर राष्ट्रवादी, आणखी एका बड्या महिला नेत्यांना दिला इशारा

Mohit Kamboj vs NCP : मोहीत कंबोज यांच्या रडारवर राष्ट्रवादी, आणखी एका बड्या महिला नेत्यांना दिला इशारा

Mohit Kamboj vs NCP : मोहीत कंबोज यांच्या रडारवर राष्ट्रवादी, आणखी एका बड्या महिला नेत्यांना दिला इशारा

दरम्यान मोहीत कंबोज यांनी पुन्हा राष्ट्रवादीलाच डिवचले आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांनाच थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 ऑगस्ट : भाजप नेते मोहित कंबोज ट्वीटच्या माध्यमातून नेहमी चर्चेत असतात. (Mohit Kamboj vs NCP) मागच्या काही महिन्यांपासून मोहीत कंबोज यांनी ट्वीट केले की काहीतरी खळबळजणक होणार असल्याचे संकेत येत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कारवाई होणार असे ट्वीट केले होते. यावरून ते जोरदार चर्चेत आले होते दरम्यान त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीलाच डिवचले आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांनाच थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे.

जाहिरात

विद्या चव्हाण ह्या राष्ट्रवादीच्या सक्रीय नेत्या आहेत त्यांनी विविध मुद्यांवरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान मोहीत कंबोज यांनी विद्याताई जय श्रीराम या त्यांच्या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात नेमके काय होणार याबाबत चर्चा रंगली आहे. बिल्कीस बानो प्रकरणात 11 जणांची सुटका करण्यात आली यावरून राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतरच कंबोज यांनी ट्वीट केल्याने नेमका काय इशारा आहे हे येणारा काळ ठरवणार आहे.

हे ही वाचा :  …तर राज्यात मध्यावधी निवडणुका अटळ, जयंत पाटलांचं मोठं विधान

गुजरात दंगली दरम्यान बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार प्रकरणातील 11 जणांची सुटका करण्यात आली. एवढेच नाहीतर त्यांच्या सुटकेनंतर त्यांना हारतुरे घालून मिठाईही भरवण्यात आली होती. स्त्रीच्या चारित्र्यावर जर कुणी अशाप्रकारे कृत्य करीत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवला जाणार. महिलांच्या चारित्र्यावर जर कोणी हल्ला चढवला असेल तर तो कुण्याही धर्माचा असला तरी त्याला माफी नाही. अशा प्रवृत्तीला कायम विरोध असणार असे मत विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले होते.  

जाहिरात

या प्रकरणी आम्ही आंदोलन छेडणार असल्याचा इशारा चव्हाण यांनी दिला होता. राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांच्या याच वक्तव्यावरुन मोहित कंबोज यांनी हे ट्विट केल्याची चर्चा आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये केवळ विद्या चव्हाण यांना जय श्रीराम एवढचं म्हटलं गेले आहे.

हे ही वाचा :  शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय मुंबईत नाहीच, महत्त्वाची माहिती आली समोर

स्त्रीचे चारित्र्य हाच तीचा धर्म आहे. त्यामुळे एखाद्या स्त्रीवर कोणी अशाप्रकारे हल्ला चढवत असेल तर त्याला माफी नाही. मग तो कोणत्याही जातीचा धर्माचा आहे हे देखील पाहिले जाणार नाही असे चव्हाण यांनी सूचित केले होते. मर्दाला लढायचं असेल तर त्यांनी अशा कुरघुड्या न करता थेट मैदनात लढावं त्यांचे हेच विधान झोंबल्याने कंबोज यांनी अशाप्रकारे ट्विट केले आहे. शिवाय यामध्ये दुसऱ्या कुण्याही व्यक्तीचे नाव नाहीतर हा सूचक इशारा केवळ विद्या चव्हाण यांच्यासाठीच आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , NCP , Tweet
  • First Published :
जाहिरात
जाहिरात