राहुल खंदारे, प्रतिनिधी
बुलढाणा, 28 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत त्याकडे लक्ष आहे. सुप्रीम कोर्टाने जर पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्या आमदारांना निलंबित केलं तर शिंदे सरकार कोसळले आणि त्यानंतर राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी केलं. मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना जयंत पाटील यांनी शिंदे सरकार आणि राज्यपालांवर टीकास्त्र सोडले.
'शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.. त्यानंतर बहुमत चाचणी करायला राज्यपालांनी त्यांना भाग पाडले' असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला.
'भारतात लोकशाही टिकवण्यासाठी पंक्षांतर बंदीचा कायदा झालेला आहे त्याच योग्य अमल झाला तर...कुणी कुठून ही निवडून या आम्ही त्यांना गोळा करू म्हणणाऱ्यांना आळा बसण्यासाठी सुप्रीम कोर्टाने योग्य निर्णय दिला पाहिजे, अशी अपेक्षाही जयंत पाटलांनी व्यक्त केली.
('मला चौकशीसाठी आधीही बोलावलेलं', ईडी चौकशीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया)
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण दौरा करत असल्याचं त्यांनी सांगितले मात्र रोहित पवार यांच्या बद्दल त्यांनी बोलणं टाळलं. रोहित पवार यांच्या मागेही ED चा ससेमिरा लागत आहे. त्यांच्यावर देखील आता आरोप होत आहेत. त्यामुळे ED च्या रडारवर पवार कुटुंब आहे का यावर जयंत पाटील यांनी त्याबाबत मला काही माहिती नाही. या बाबत माहिती घेऊन मी सांगेल असं सांगत जयंत पाटलांनी पुढे बोलण्याचं टाळलं.
(शिंदे-ठाकरे गटात मानापमान नाट्य; खैरेंचा सत्कार आधी केला म्हणून शिरसाट रागावले, शेवटी...)
'गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यामुळे मोठं नुकसान झालं. आझाद हे काँग्रेसचे मोठे नेते होते त्याची जम्मू काश्मीरमध्ये घट्ट पकड होती. त्यामुळे अंतर्गत वादामुळे आझाद बाहेर पडले असतील त्याचा फटका हा काँग्रेस सोबत राष्ट्रवादीला देखील बसला असल्याची कबुली त्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lokmat news, Lokmat news 18, Marathi news, शिवसेना, सुप्रीम कोर्ट