मुंबई, 27 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या कार्यालयाबाबत गेल्या आठवड्यात महत्त्वाची माहिती समोर आली होती. शिंदे गट मुंबईत प्रति शिवसेना उभारणार असल्याची माहिती समोर आली होती. पण या बातमीचं खंडन करण्यात आलं होतं. त्यानंतर शिंदे गट प्रत्येक विभागात कार्यालय उभारणार असल्याची माहिती समोर आली होती. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांसोबत संपर्क राहण्यासाठी प्रत्येक प्रभागात शिंदे गट कार्यालया उभं करणार असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय हे ठाण्यात राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाण्यात टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांचे निवासस्थान आणि कार्यलय हेच शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मुंबईतील पहिले विभागप्रमुख म्हणून यशवंत जाधव यांची नियुक्ती जाहीर केली आहे. ही नियुक्त जाहीर करताना शिंदे गटाने जे पत्र प्रसिद्ध केलंय त्यात त्यांचे मध्यवर्ती कार्यालय ठाणे टेंभी नाका येथील आनंद आश्रम असा पत्ता लिहिण्यात आलाय. आनंद आश्रम म्हणजे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे निवासस्थान आणि कार्यालय. आनंद दिघे यांचा निवासस्थान आणि कार्यालय हेच आता शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय म्हणून दाखवण्यास येत आहे.
('मला चौकशीसाठी आधीही बोलावलेलं', ईडी चौकशीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया)
शिवसेनेसाठी शिवसेना भवन हे प्रेरणास्थान होतं. शिवसेनेच्या सेना भवनाला विशेष महत्त्व आहे. कारण या शिवसेना भवनाने अनेक उतार चढाव पाहिले. एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतल्याने शिवसेनेचं खूप मोठं नुकसान झालं आहे. कारण 40 आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत शिंदे यांना पाठिंबा दिला. या निर्णयानंतर शिवसेनेच्या या आमदारांनी एकामागेएक वेगळी भूमिका मांडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.