मुंबई, 8 ऑक्टोबर : निवडणूक आयोगाकडून राजकारणाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरेंसह शिंदे गटालाही धनुष्यबाण आणि शिवसेना हे पक्षाचं नाव तात्पुरत्या स्वरुपात तरी वापरता येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठी झटका आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील मनिषा कायंदे यांनी भीती व्यक्त केली होती. निवडणूक आयोगाकडून येणारा निर्णय फार सकारात्मक नसल्याचं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होतं.
नेमकं काय म्हणाल्या होत्या कायंदे.. निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या अखत्यारित येतं, त्यामुळे पुढे काय होऊ शकतं, याचा अंदाज लावणं फार काही कठीण नाही, असं मनिषा कायंदे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या. मनिषा कायंदे यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या लढाईआधीच धनुष्यबाण टाकून दिला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘तरीपण आम्ही ही लढाई लढतो आहोत. आम्ही आमची बाजू आयोगापुढेही मांडू. आयोग आमचं म्हणणं नक्कीच ऐकेल, अशी आशा आम्हाला आहे’, असंही मनिषा कायंदे म्हणाल्या होत्या. ठाकरेंच्या वर्मावरच घाव; इतिहासातील पहिली निवडणूक शिवसेनेचं नाव अन् चिन्हाशिवाय! काय आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश. 1.दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही. 2. दोन्ही गटांपैकी कोणालाही “धनुष्य आणि बाण” हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. 3. दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील. संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. 4. दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 5. त्यांच्या गटांची नावे ज्याद्वारे त्यांना आयोगाने मान्यता दिली असेल आणि यासाठी, प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या, त्यापैकी कोणीही असू शकतो.