मुंबई, 29 ऑक्टोबर : ‘टाटा एअर बस प्रकल्पाबद्दल उद्योगमंत्री छाती ठोकपणे सांगत होते, प्रकल्प महाराष्ट्रातच येणार मग कसा निघून गेला? उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? महाराष्ट्राला उद्योगमंत्र्यांचा राजीनामा हवाय, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. टाटा एअरबस प्रकल्प गुजरातल्या गेल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला.
ओला दुष्काळ जाहीर करा हे पावसाळा अधिवेशनात सांगितलं. मागण्या केल्या तरी शेतकऱ्यांचा आवाज ऐकला नाही. परतीच्या पावसामुळं शेताचं चिखल झाला आहे. ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी आम्ही आजही करतोय. ही वेळ शेतकऱ्यांना धीर देण्याची आहे.. आत्महत्या अजूनही होतायत पण घटनाबाह्य सरकारनं अजून दखल नाही घेतली, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. (‘कडू’ वाद होणार गोड, मुख्यमंत्री शिंदेंनी रवी राणांना वर्षा बंगल्यावर बोलावलं) एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेला. वेदांता फॉक्सकॉन, ऑगस्टपर्यंत बैठका झाल्या पण सप्टेंबबरला गुजरातकडे गेला. महाराष्ट्रातून चार मोठे प्रकल्प गुजरातकडे गेले आहे. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेड टेक पार्क, आणि आता टाटा एअरबस प्रकल्प हे चार प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेले. टाटा एअर बस प्रकल्पाबद्दल उद्योगमंत्री छाती ठोकपणे सांगत होते प्रकल्प महाराष्ट्रातच येणार मग कसा निघून गेला?उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? महाराष्ट्राला उद्योगमंत्र्यांचा राजीनामा हवाय, अशी मागणीच आदित्य ठाकरेंनी केली. तसंच, ‘उद्योगमंत्र्यांना स्वतःचं काम जमत नाही तीन पक्षात गेले, कॅबिनेट मंत्री राहिले तरी कार्यपद्धती शिकले अजूनही नाही, असा सणसणीत टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला. ( ठाकरे गटाच्या आमदाराचे 6 दिवस आमरण उपोषण, जिल्हाधिकाऱ्यांनी काढला थेट आदेश ) ‘माझी खिल्ली उडवताय ठीक आहे पण महाराष्ट्राला जितकं मागे नेत आहे. त्यामुळं महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असंही आदित्य ठाकरेंनी बजावलं. ‘ती शिवसेना नाही, गद्दार सेना आहे. २०१४ ते १९ सुभाष देसाई उद्योगमंत्री होते २०१९ नंतर कोविड काळात सुद्धा त्यांनी साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. पूर्वीचं सरकार महाविकास आघाडी सरकार असून केंद्रातील सरकारसोबत काम करू शकत होतं तर आता का नाही? यांचं इंजिन का फेल झालंय? असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारला. या सरकारचं लक्ष फक्त राजकारणावर आहे. एकाच पक्षाचं राज्यात आणि केंद्रात सरकार असताना प्रकल्प कसे निघून जातात? तेही उद्योगमंत्र्यांनी छाती ठोकपणे सांगितल्यानंतर. टाटा साहेबांशी बोलू म्हणाले, भेटले मग चर्चा काय प्रकल्प गुजरातला पाठवा अशी झाली? असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

)







