उस्मानाबाद, 29 ऑक्टोबर : राज्य शासनाकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी गेल्या सहा दिवसापासून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी बेमुदत आमरन उपोषण आंदोलन पुकारले आहे. याच आंदोलनाच्या समर्थनात आज (दि.29) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्हा बंदची आव्हान केले आहे. खासदारांच्या या आव्हानाला उस्मानाबाद जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी घेत. पिक विमा कंपन्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे. 1208 पैकी उर्वरित 373 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पुणे येथील कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.
हे ही वाचा : SRA घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, किरीट सोमय्यांनी केला नवा दावा
जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल विमा कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी कंपनीकडून 201 कोटींचा विमा कंपनीने जमा केला आहे. पीक विमा मिळावा म्हणून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील मागच्या काही दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयामुळे कैलाश पाटील यांच्या उपोषणाला यश आले असले तरी पूर्ण विमा मिळेपर्यंत त्यांचे उपोषण राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिवसैनिक थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर
उस्मानाबाद येथील शिवसैनिक आक्रमक झाले होते. काल (दि.28) शुक्रवारी शिवसैनिकानी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून घोषणाबाजी केली. जो पर्यंत शासन निर्णय घेत नाही तो पर्यंत इमारतीच्या खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता.
हे ही वाचा : 'जगात जे काही घडले ते सरकार आल्यामुळेच' शिवसेनेनं उडवली शिंदे सरकारची खिल्ली
आमदार कैलास पाटील हे 3 लाख 57 हजार पात्र शेतकऱ्याच्या पिकविमा, मदतसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले आहेत. आमदार कैलास पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Osmanabad, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)