जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दिवाळीत महाराष्ट्राने फोडले सर्वाधिक फटाके; यंदा देशभरात इतक्या कोटींची उलाढाल

दिवाळीत महाराष्ट्राने फोडले सर्वाधिक फटाके; यंदा देशभरात इतक्या कोटींची उलाढाल

प्रतीकात्मक फोटो.

प्रतीकात्मक फोटो.

गेली दोन वर्षं कोरोनाच्या सावटामुळे निर्बंध होते, त्यामुळे यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करत लोकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले. यंदा फटाक्यांची सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 31 ऑक्टोबर : दिवाळीचा सण आता संपलाय, काही ठिकाणी अजूनही फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा भारतातील फटाके उद्योगात प्रचंड तेजी आली आहे. कारण यावर्षी फटाक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. दिल्ली वगळता देशभरात सुमारे 6,000 कोटी रुपयांची किरकोळ फटाक्यांची विक्री झाली. यंदा फटाक्यांच्या किमतीत वाढ होऊनही विक्रीत वाढ नोंदवली गेली आहे. गेली दोन वर्षं कोरोनाच्या सावटामुळे निर्बंध होते, त्यामुळे यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करत लोकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले. यंदा फटाक्यांची सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आहे. या संदर्भात ‘द मिंट’ने वृत्त दिलंय. मुघलांनी भारतात आणलेला दारूगोळा; सण-उत्सवांचा भाग असलेल्या फटाक्यांचा रंजक इतिहास यावर्षी तुलनेने फटाक्यांची विक्री जास्त होती. यंदा 2016 आणि 2019 प्रमाणे बिझनेस ट्रेंड पाहायला मिळाला. तमिळनाडू फायरवर्क्स अँड एमोर्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (TANFAMA) अध्यक्ष गणेशन पंजूराजन यांनी सांगितलं की, “सध्याची 6,000 कोटी रुपयांची किरकोळ उलाढाल हा केवळ बॉलपार्कचा आकडा आहे. यातून किमती वाढल्याची बाबही दिसून येते. 2016 आणि 2019मध्ये ही उलाढाल अनुक्रमे 4 हजार व 5 हजार कोटी रुपयांची होती. तर, 2022 आणि 2021 मधील एकूण किरकोळ विक्री अनुक्रमे मागील वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी होती. यंदा सर्वाधिक फटाक्यांची विक्री महाराष्ट्रात झाली. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातमध्ये झाली. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राने एकूण फटाक्यांच्या उत्पादनातील मोठा हिस्सा विकत घेतला,” असं गणेशन म्हणाले. “उत्पादन केलेले सर्व फटाके ग्रीन म्हणजे पर्यावरणपूरक होते. सर्वोच्च न्यायालय आणि सरकारी अथॉरिटीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फटाक्यांचं उत्पादन करण्यात आलं होतं. बेरियम नायट्रेटचा वापर करण्यास परवानगी नसल्यामुळे इतर परवानगी असलेल्या वस्तू जसं की स्ट्रॉन्शिअम नायट्रेट आणि इतर ऑक्सिडायझिंग एजंट्सचा वापर फटाक्यांसाठी करण्यात येतोय. दरम्यान, स्ट्रॉन्शिअमसारख्या रसायनांच्या संदर्भात आमच्यासमोर एक मोठे आव्हान आहे, कारण त्यांचं शेल्फ-लाइफ खूपच कमी आहे आणि त्याचा वापर करून फटाके निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत जास्त मेहनत लागते,” असंही गणेशन यांनी सांगितलं. ग्लासखाली फटाके फोडणं जीवावर बेतलं; प्रायव्हेट पार्टमध्ये स्टीलचे तुकडे घुसून तरुणाचा मृत्यू तमिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशी हे फटाके उद्योगाचे राष्ट्रीय केंद्र आहे. अयान फायरवर्क्सचे व्यवस्थापकीय संचालक जी. अबिरुबेन म्हणाले की, ‘या वर्षी फटाक्यांची विक्री जोरदार झाली. यंदा आम्ही नियमांचे पालन करून ग्रीन फटाक्यांचं उत्पादन आणि विक्री केली. यामुळे विषारी वायू उत्सर्जनात 35% घट झाली आहे.’ या वेळी अबिरुबेन यांनी लोकांच्या फटाक्यांच्या पसंतीबद्दल भाष्य केलं. ‘शॉट्स’ व आकाशात जाऊन फुटणारे फटाके लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. हा एक ट्रेंड आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक कमी आवाजाच्या फटाक्यांची निवड करत आहेत. यंदा अनार, भुईचक्र, फटाके आणि रॉकेट या प्रकारांची चांगली विक्री झाली,’ असं त्यांनी सांगितलं. फटाक्यांवर बंदी लागू करणार्‍या राजधानी दिल्ली वगळता जवळपास सर्वत्र फटाक्यांना चांगली मागणी होती. ही वर्षांपूर्वी एकूण फटाक्यांच्या विक्रीच्या तुलनेत या जॉइंट क्रॅकर्सचा वाटा हा अंदाजे 1,000 कोटी रुपये इतका होता. पण 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने बेरिअम नायट्रेटच्या वापरावर बंदी घातली, त्यानंतर त्याचा वापर करणं थांबवण्यात आलं.’

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: diwali
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात