जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मुघलांनी भारतात आणलेला दारूगोळा; सण-उत्सवांचा भाग असलेल्या फटाक्यांचा रंजक इतिहास

मुघलांनी भारतात आणलेला दारूगोळा; सण-उत्सवांचा भाग असलेल्या फटाक्यांचा रंजक इतिहास

मुघलांनी भारतात आणलेला दारूगोळा; सण-उत्सवांचा भाग असलेल्या फटाक्यांचा रंजक इतिहास

पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर म्हणजेच 1526 नंतर भारताला गनपावडरची माहिती झाली. तेव्हापासूनच भारतीयांना फटाक्यांची (आतषबाजी) ओळख झाली

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 22 ऑक्टोबर : सध्या सर्व भारतीयांचा आवडता सण असलेल्या दिवाळीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (21 ऑक्टोबर) वसुबारसेपासून सुरू झालेला दिवाळीचा सण पाच दिवस चालेल. दिवाळी म्हटलं, की बच्चेकंपनी सर्वांत जास्त आनंदी असते. कारण त्यांना नवीन कपड्यांसोबतच फटाके उडवण्याचीही संधी मिळते. अनेक शतकांपासून विविध देशांत सण-उत्सवाच्या काळात फटाके उडवले जातात; मात्र या फटाक्यांचा उदय कसा झाला, हे तुम्हाला माहिती आहे का? सध्या पर्यावरणासाठी घातक ठरत असलेल्या फटाक्यांना कित्येक शतकांचा इतिहास आहे. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मुघलांनी आणला दारूगोळा भारतामध्ये मुघलांबरोबर गनपावडरचं आगमन झालं. पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये गनपावडर आणि तोफांचा वापर करण्यात आला होता. बाबरच्या आधुनिक तोफखान्यासमोर इब्राहिम लोधी टिकू शकला नाही आणि त्यामुळे बाबरनं युद्ध जिंकलं. पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर म्हणजेच 1526 नंतर भारताला गनपावडरची माहिती झाली. तेव्हापासूनच भारतीयांना फटाक्यांची (आतषबाजी) ओळख झाली. अकबराच्या काळात विवाह आणि उत्सवांमध्ये फटक्यांचा वापर होऊ लागला. ज्या गनपावडरपासून फटाके तयार होत, ती महाग होती. म्हणून फटाके हे प्रतिष्ठेशी जोडले गेले होते. दीर्घ काळ ते फक्त शाही घराणी आणि श्रीमंत लोकांच्या मनोरंजनाचं साधन होते. पूर्वी लग्नात फटाके वाजवून विविध कला दाखवणारे करणारे कलाकार असायचे. त्यांना ‘आतिषबाज’ म्हणत. ऐन दिवाळीत घरची आर्थिक परिस्थिती ठीक नाहीये? चिंता करू नका; लगेच सुरु करा ही कामं चीन आहे गनपावडरचा जनक फटाक्यांचं मूळ चीनमध्ये आढळतं. चीनमध्ये सहाव्या ते नवव्या शतकात गनपावडरचा शोध लागला. तांग राजवंशाच्या काळात हा शोध लागला होता. म्हणजेच इतर अनेक गोष्टींप्रमाणे फटाक्यांचा जन्मही खऱ्या अर्थाने चीनमध्येच झाला आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा चिनी नागरिक बांबू आगीमध्ये जाळत तेव्हा त्यात असलेले हवेचे बुडबुडे फुटायचे. त्यांना आपण पृथ्वीवरील नैसर्गिक फटाके म्हणू शकतो. आगीत बांबू जाळल्यानंतर होणाऱ्या आवाजामुळे वाईट शक्तींचा नाश होतो, असा चीनमध्ये समज आहे. त्यानंतर चीनमध्ये पोटॅशियम नायट्रेट, सल्फर आणि चारकोल यांचं मिश्रण करून गनपावडर तयार करण्यात आली. ही पावडर बांबूच्या आवरणात भरून तो जाळला असता, त्याचा मोठा स्फोट होतो, हे तिथल्या माणसांच्या लक्षात आलं. पुढे बांबूची जागा कागदाच्या पुंगळ्यांनी घेतली. ब्रिटिशांच्या काळात झाली मॉडर्न फटाक्यांची सुरुवात भारतामध्ये आधुनिक फटाके बनवण्याचं काम ब्रिटिश सरकारच्या काळात कलकत्त्यात सुरू झालं. 19व्या शतकात फटाके बनवण्यासाठी एका लहान मातीच्या भांड्याचा वापर होत असे. त्यात गनपावडर टाकून ते जमिनीवर आपटलं, की त्यातून प्रकाश आणि आवाज बाहेर पडायचा. कदाचित त्यामुळेच त्याला ‘फटाका’ असं नाव मिळालं असावं. तेव्हा त्याला ‘भक्तापू’ किंवा ‘बंगाल लाइट्स’ असं म्हणत. ब्रिटिश सरकारच्या काळात बंगाल हे उद्योगाचं केंद्र होतं. तिथे माचिसची फॅक्टरी होती. त्यामध्ये गनपावडरचा वापर केला जात असे. त्यामुळे तिथेच आधुनिक भारतातला पहिला फटाका कारखाना स्थापन झाला. हा कारखाना नंतर तमिळनाडूमधल्या शिवकाशी येथे ट्रान्स्फर झाला. Diwali Home Loan Offers: घराचं स्वप्न आता पूर्ण होणार! दिवाळीत ‘या’ बँकांकडून व्याजदरात कपात सध्या तमिळनाडूमधलं शिवकाशी हे भारतातलं फटाके बनवण्याचं सर्वांत मोठं केंद्र आहे. फटाके शिवकाशीपर्यंत पोहोचण्याची गोष्टही रंजक आहे. पी. अय्या नाडर आणि त्यांचा भाऊ षण्मुगा नाडर 1923 मध्ये बंगालमधल्या एका माचिस फॅक्टरीत काम करण्यासाठी आले होते. तिथे त्यांनी माचिस बनवण्याचं कौशल्य आत्मसात केलं. आठ महिन्यांनंतर नाडर बंधू कलकत्त्याहून शिवकाशीला परतले. तेव्हा त्यांनी जर्मनीतून मशीन्स आयात करून अनिल ब्रँड आणि अय्यन ब्रँडच्या माचिसची निर्मिती सुरू केली. नंतर, त्यांनी फटाकेही बनवले आणि बघता बघता तमिळनाडूतली शिवकाशी ही भारताची ‘फायरवर्क कॅपिटल’ बनली. तमिळनाडूच्या विरुधनगर जिल्ह्यातल्या शिवकाशीमध्ये सध्या फटाकेनिर्मितीचे सुमारे आठ हजार लहान-मोठे कारखाने कार्यरत आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे एक हजार कोटी रुपये आहे. दरम्यान, 1940 मध्ये ब्रिटिश सरकारने इंडियन एक्प्लोसिव्ह कायदा बनवला. त्यामुळे फटाके बनवण्यासाठी आणि बाळगण्यासाठी परवाना घेणं आवश्यक झालं. म्हणूनच फटाक्यांची पहिली अधिकृत फॅक्टरी 1940मध्ये बांधली गेली, असं म्हणतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: diwali
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात