जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जागेवरुन लोकलमध्येच दोन गटांत तुंबळ हाणामारी, नालासोपाऱ्यातील घटनेचा Shocking Video

जागेवरुन लोकलमध्येच दोन गटांत तुंबळ हाणामारी, नालासोपाऱ्यातील घटनेचा Shocking Video

जागेवरुन लोकलमध्येच दोन गटांत तुंबळ हाणामारी, नालासोपाऱ्यातील घटनेचा Shocking Video

नालासोपारा स्थानकात चौथ्या सीटवर बसण्यावरुन दोन गटांमध्ये वाद झाला. विरारवरून चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये सकाळी हा प्रकार घडला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नालासोपारा 14 नोव्हेंबर : रोज कामाला जाण्यासाठी नागरिक अगदी धावतपळत लोकल ट्रेन पकडतात. मात्र, ट्रेनमधील गर्दीत स्वतःसाठी जागा मिळवण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते. यावरुन अनेकदा प्रवाशांमध्ये वाद झाल्याचंही पाहायला मिळतं. मात्र, कधीकधी हा वाद इतका टोकाला जातो, की गर्दीतही हे प्रवासी एकमेकांची धुलाई करू लागतात. VIDEO - त्या क्षणी RPF जवान तिथं नसता तर तिचं काय झालं असतं; ‘ते’ भयंकर दृश्य CCTV मध्ये कैद अशाच एका घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. यात नालासोपारा स्थानकात चौथ्या सीटवर बसण्यावरुन दोन गटांमध्ये वाद झाला. विरारवरून चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये सकाळी हा प्रकार घडला. पुढे हा वाद इतका वाढला की तिथेच दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. या हाणामारीचा व्हिडिओही आता व्हायरल झाला आहे.

जाहिरात

पुण्यात बस चालकाला मारहाण - दरम्यान पुण्यातूनही मारहाणीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात स्वारगेट डेपोची बस क्रमांक सीएनजी 799 डी आर2550 मार्ग क्रमांक 29/6 पुणे स्टेशन चौकात आली असता एका दुचाकीस्वाराने बसला गाडी आडवी घातली. यानंतर या तरुणाने ड्रायव्हरसोबत वाद घातला. Viral : मालगाडी खाली अडकली व्यक्ती, जीवन मरणाचा संघर्ष व्हिडीओत कैद इतक्यावरच हा तरुण थांबला नाही तर त्याने ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना जबर मारहाणही केली. यानंतर या तरुणाचा मित्रही चालक आणि कंडक्टरला मारहाण करू लागला. या घटनेची नोंद पोलीस चौकीत असून दोन तरुणांना याबाबत अटक केलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात