तिरुवनंतपुरम, 12 नोव्हेंबर : आरपीएफ जवानांचे किती तरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आरपीएफ जवानामुळे एका मुलीसोबत भयंकर घडता घडता राहिलं आहे. रेल्वे स्टेशनवर मुलीसोबत जे घडलं त्यावेळी तो जवान तिथं नसता तर तिचं काय झालं असतं या कल्पनेनेही अंगावर काटा येतो आहे. असं या मुलीसोबत नेमकं काय घडलं, ते पाहुयात.
रेल्वे स्टेशनवर मुलीसोबत घडलेलं ते दृश्य स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहूनच तुम्हालाही धडकी भरेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकताप्लॅटफॉर्मवर एक ट्रेन दिसते आहे. तशी प्लॅटफॉर्मला गर्दी नाही आहे. इतक्यात एक मुलगी समोरील जिन्यावरून धावत येते आणि ट्रेन पकडताना तिच्यासोबत घडू नये तेच घडतं.
हे वाचा - Viral : मालगाडी खाली अडकली व्यक्ती, जीवन मरणाचा संघर्ष व्हिडीओत कैद
मुलगी ट्रेन पकडते आणि तेव्हाच ट्रेन सुरू होते. तरी मुलगी ती ट्रेन सोडत नाही. ट्रेनमध्ये ती चढण्याचा प्रयत्न करते पण तिचा हात सटकतो आणि ती ट्रेनसोबत फरफटत जाते. ट्रेनच्या आतील व्यक्ती त्या मुलीला मदत करायला जातो. तिचा हात धरून तिला आत खेचण्याचा प्रयत्न करतो. पण त्यालाही ते शक्य होत नाही. त्याच्या हातातून तिचा हात सुटतो आणि ती खाली कोसळते.
हे सगळं घडत असताना तिथंच आरपीएफ जवान उभा दिसतो आहे. मुलीला ट्रेनसोबत फरफटत जाताना पाहून तो तिला वाचवण्यासाठी धाव घेतो आणि जशी ती प्लॅटफॉर्मवर पडते तसं तिला सावरतो. जेणेकरून ती प्लॅटफॉर्मवरून खाली ट्रॅकवर पडणार नाही. नाहीतर ट्रेनच्या वेगासोबत तोल जाऊन ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमधून खाली गेली असती. पण आरपीएफ जवानाने तिला वेळीच सावरल्याने सुदैवाने तिच्यासोबत काही भयंकर घडलं नाही. तो तिला ट्रेनपासून लगेच दूर करतो म्हणून तिचा जीव वाचला.
हे वाचा - Viral Video: यमराज सुट्टीवर होता वाटतं? तरुणीसोबत जे घडलं, ते पाहून तुम्ही असंच म्हणाल
@RPF_INDIA ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना केरळच्या थिरूर रेल्वे स्टेशनवरील आहे.
Alert #RPF Head Constable Satheesh acted swiftly and saved a minor girl from going under the wheels of train when she fell down while trying to board a running train at Tirur railway station.#MissionJeewanRaksha #LifeSavingAct #BeResponsible #BeSafe pic.twitter.com/R0iMdas4WX
— RPF INDIA (@RPF_INDIA) November 11, 2022
या आरपीएफ जवानाचं नाव सतीश आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर जवानाच्या कामगिरीचं कौतुक केलं जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kerala, Railway, Train, Viral, Viral videos