मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हृदयद्रावक! विरारमध्ये गरबा खेळताना युवकाचा मृत्यू, बातमी ऐकताच वडिलांनीही सोडला जीव

हृदयद्रावक! विरारमध्ये गरबा खेळताना युवकाचा मृत्यू, बातमी ऐकताच वडिलांनीही सोडला जीव

पिता-पुत्राचा मृत्यू

पिता-पुत्राचा मृत्यू

विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे राहणारा मनीष नरपत जैन हा रात्रीच्या सुमारास बिल्डिंगच्या आवरात गरबा खेळत होता. यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अमित राय, विरार 03 ऑक्टोबर : देशभरात नवरात्रीचे नऊ दिवस अगदी आनंदात साजरे होतात. विविध जाती-धर्माचे लोक रात्रीच्या गरब्यात सहभागी होतात आणि मनसोक्त नाचतात. अनेकदा तहान-भूक विसरून बेधुंद होऊन गरबा वा दांडिया खेळणाऱ्यांकडे पाहिलं तर आश्चर्यच वाटतं. मात्र हाच गरबा एका कुटुंबावर दु:ख घेऊन आला. विरारमध्ये गरबा खेळणं पिता-पुत्राच्या जीवावर बेतलं आहे.

विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे राहणारा मनीष नरपत जैन हा रात्रीच्या सुमारास बिल्डिंगच्या आवरात गरबा खेळत होता. यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याच्या वडिलांनी आणि तिथे असलेल्या नागरिकांनी त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात नेलं. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.

नवरात्रीच्या गरब्यादरम्यान धक्कादायक घटना, वाशिममधील दोघांचा मृत्यू

रुग्णालयात उपचाराआधीच मुलाचा मृत्यू झाल्याचं ऐकताच या धक्क्याने त्याचे वडील नरपत जैन यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. यात त्यांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनं एकच खळबळ उडाली. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. गरबा खेळताना एकाच दिवशी घरातील दोन सदस्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वाशिममधूनही अशीच घटना समोर आली आहे. पहिली घटना ही वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील आहे. येथील गोपाल इन्नानी 30 सप्टेंबरला रात्री महेश भवन येथे गरबा खेळत होते. मात्र, याचदरम्यान, गरबा खेळताना ते अचानक पडले आणि क्षणार्धात त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Video : 50 जणांमध्ये कॅमेऱ्याची नजर त्याच्यावरच, गरबा खेळता खेळता कोसळला अन् मृत्यू

यासारखीच आणखी एक दुर्घटना कारंजा लाड शहराच्या शांतीनगर येथील सुशील काळेसोबत घडली. सुशील काळे हा तरुण 1 ऑक्टोबरच्या रात्री गरबा नृत्यात सहभागी झाला होता. यानंतर गरबा खेळून ते घरी पोहोचले. सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. मात्र, डॉक्टरजवळ जाण्याआधीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला

First published:

Tags: Heart Attack, Virar