मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : 50 जणांमध्ये कॅमेऱ्याची नजर त्याच्यावरच, गरबा खेळता खेळता कोसळला अन् मृत्यू

Video : 50 जणांमध्ये कॅमेऱ्याची नजर त्याच्यावरच, गरबा खेळता खेळता कोसळला अन् मृत्यू

निशब्द करणारा Video....

निशब्द करणारा Video....

निशब्द करणारा Video....

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

तारापूर, 2 ऑक्टोबर : आज नवरात्रौत्सवाची सातवी माळ. देशभरात हे नऊ दिवस अगदी आनंदात साजरे होतात. विविध जाती-धर्माचे लोक रात्रीच्या गरब्यात सहभागी होतात आणि मनसोक्त नाचतात. अनेकदा तहान-भूक विसरून बेधुंद होऊन गरबा वा दांडिया खेळणाऱ्यांकडे पाहिलं तर आश्चर्यच वाटतं. मात्र हाच गरबा एक कुटुंबावर दु:ख घेऊन आला.

ही घटना तारापूर येथील आहे. विविध सोसायट्यांमध्ये छोटे खानी स्वरुपात गरब्यात आयोजन केलं जातं. नागरिकही त्यात हिरिरीने सहभागी होतात. मात्र तारापूर येथे गरबा खेळत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तारापुरमधील आदी शिवशक्ती सोसायटीमध्ये गरब्याच आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान गरबा खेळता खेळता एक तरुण खाली कोसळला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Heart Attack