मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Diwali 2022 : मराठी तरुणाने सुरू केला eco-friendly आकाशकंदीलाचा व्यवसाय, पाहा Video

Diwali 2022 : मराठी तरुणाने सुरू केला eco-friendly आकाशकंदीलाचा व्यवसाय, पाहा Video

दिवाळीत घर सजावटीतला अनिवार्य घटक म्हणजे आकाशकंदील. मुंबईतल्या लालबाग परिसरातल्या तरूणांनी यंदा इको फ्रेंडली आकाशकंदील बनवले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 ऑक्टोबर : दिवाळीत घर सजावटीतला अनिवार्य घटक म्हणजे आकाशकंदील. वेगवेगळ्या आकाराचे, विविध रंगाचे आकाशकंदील सध्या ट्रेंडींगमध्ये आहेत. दिवाळी काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. या दिवाळीसाठी आकाशकंदील कसे बनताहेत आणि आकाशकंदीलचा काय भाव असणार आहे? या विषयी जाणून घेऊयात.

चिनी आकाशकंदीलचा खप कमी झाल्यामुळे आता अनेकांनी आकाशकंदील बनवून विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळतोय. दिवाळीच्या 1 महिना आधीपासूनच आकाशकंदील बनवायला सुरुवात होते. कस्टमाईज पद्धतीने सुद्धा आकाशकंदील बनवले जातात. मुंबईतल्या लालबाग परिसरातल्या तरूणांनी यंदा इको फ्रेंडली आकाशकंदील बनवले आहेत.

यावर्षी कशाला मागणी?

पारंपारिक आकाराचा आणि मोठ्या आकाशकंदीलला या वर्षी जास्त मागणी आहे. हे आकाशकंदील बनवताना मोठी, खण, कापड, मोर डिझाईनच्या चमकी लेस, गोल कुयरी आकाराचे पॅचेस, सॅटिन लेस यांच्या मदतीनं बनवले जातात.  गडद रंगाचे रंगींबेरंगी तसेच चौकोनी, गोल, षटकोनी आकाराचे आकाशकंदीलही बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

कशी झाली सुरूवात?

मुंबईत कल्पक आर्ट्सच्या माध्यमातून स्वदेशी आणि इको फ्रेंडली आकाशकंदील बनवण्यात आले आहेत. हे तरुण 12 वर्षांपूर्वी  आकाशकंदील खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. त्यावेळी याच्या किंमती बऱ्याच जास्त आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सामान्यांना परवडतील असे आकाशकंदील घरी बनवण्यास सुरूवात केली. या वर्षी त्यांनी विविध आकरांचे आकाशकंदील बनवले असून. ग्राहकांना विशेष थीमचे किंवा कोणत्याही पक्षाच्या चिन्हाचे हवे तेवढे आकाशकंदील ते बनवून देतात.

फक्त 50 रुपयांत इथे मिळतोय आकाशकंदील, विश्वास बसत नाही पाहा VIDEO

'एक आकाशकंदील व्यवस्थित बनवायला 3 ते 3:30 तास लागतात. आम्ही ऑर्डर नुसार सुद्धा आकाशकंदील तयार करून देतो. 400 ते 800 रुपयांपर्यंत आमच्याकडे आकाशकंदील उपलब्ध आहेत,' असं कल्पक आर्ट्सच्या ओमकार मंचेकर, यांनी सांगितले. तर,  '12 वर्षांपासून आम्ही पारंपारिक पण त्याला वेगवेगळे टेक्सचर देऊन आकाशकंदील बनवत आहोत.' असं रुपेश गुजर यांनी स्पष्ट केले.

दिवाळीत घर सजावटीचा प्लॅन करताय? 'हा' प्रकार ट्राय करा, सर्वजण होतील इम्प्रेस, Video

गुगल मॅपवरून साभार

आकाश कंदील खरेदीसाठी संपर्क

हे आकाश कंदील तुम्हाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही रुपेश गुजर यांना  98672 46176  या नंबरवर अथवा ओमकार मंचेकर यांना 98674 36297 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

First published:

Tags: Diwali, Eco friendly, Home-decor, Mumbai