प्रमोद पाटील ; नवी मुंबई, 20 ऑक्टोबर : मागच्या तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केली. यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. या दरम्यान शिंदे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर दावा करण्यात आला. या सगळ्या प्रक्रियेत शिवसेनेचे चिन्ह गोठवण्यात आलं. मागच्या तीन महिन्यांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरून वाद झाला होता. ही घटना ताजी असतानाच नवी मुंबईतही असाच प्रकार घडला आहे. यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले यावरून काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.
नवी मुंबईत शिवसेना कार्यालय आहे. या कार्यालयावर शिंदे गटाकडून ताबा घेण्याचे काम काल (दि.19) करण्यात आले. यावरून ठाकरे गटातील काही कार्यकर्ते एकत्र येत शिंदे गटाचे आव्हान परतवून लावले. दरम्यान यावरून काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. ठाण्यानंतर नवी मुंबईतही शाखा ताब्यात घेण्यावरून वाद झाल्याने ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्ते आमनेसामने आले.
ठाण्यानंतर नवी मुंबईतही शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून वाद.
— News18Lokmat (@News18lokmat) October 20, 2022
शिंदे गटाकडून तुर्भे विभागातील 3 शाखांवर ताबा घेण्याचा प्रयत्न. pic.twitter.com/QTbbaUoLbr
शिंदे गटाकडून तुर्भे विभागातील 3 शाखांवर ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शिंदे गटाचे आव्हान परतवून लावले.
हे ही वाचा : ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढणार? भास्कर जाधवांसह या नेत्यांवर अटकेची टांगती तलवार
शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांसह येत हातोडी आणि कटरने शाखेचा लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. यावर ठाकरे गटाकडून तीव्र विरोध केल्यानंतर तीनही शाखांवर आता दोन्ही गटाचे 2 टाळे लागले आहेत. दरम्यान दोन्हीही शाखा कार्यालये बंद स्थितीत आहेत. उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपशहर प्रमुख महेश कोटीवाले यांनी शाखा ताब्यात घेण्यासाठी आलेल्या शिंदे गटाला परतवून लावत थेट आव्हान दिले. दरम्यान यावरून काही काळ वातावरण तंग बनले होते.
हे ही वाचा : ठाकरेंच्या संपत्तीवरून हायकोर्टात याचिका, पण उद्धव ठाकरे कुटुंबाची मालमत्ता नेमकी किती? पाहा आकडेवारी
भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप आक्रमक
संजय राऊत यांच्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमक बोलणारे नेते म्हणून भास्कर जाधव यांचे नाव घेतले जाते. भास्कर जाधव ज्या सभेला जातील त्या सभेत जोरदार टीका करताना पहायला मिळतात. यावरून शिंदे गट आणि भाजपचे नेतेही त्यांना प्रत्त्युत्तर देत असतात. दरम्यान भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईत भाजपकडून बॅनरबाजी करत जोरदार टीका केली आहे. भाजपकडून माहीममध्ये आपण यांना पाहिलत का? अशा आशयाचे बॅनर लावले आहेत.