जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाकरेंच्या संपत्तीवरून हायकोर्टात याचिका, पण उद्धव ठाकरे कुटुंबाची मालमत्ता नेमकी किती? पाहा आकडेवारी

ठाकरेंच्या संपत्तीवरून हायकोर्टात याचिका, पण उद्धव ठाकरे कुटुंबाची मालमत्ता नेमकी किती? पाहा आकडेवारी

ठाकरेंच्या संपत्तीवरून हायकोर्टात याचिका, पण उद्धव ठाकरे कुटुंबाची मालमत्ता नेमकी किती? पाहा आकडेवारी

उद्धव ठाकरेंच्या संपत्तीवरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, पण उद्धव ठाकरे कुटुंबाची संपत्ती नेमकी किती आहे?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 ऑक्टोबर : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये होता, तर साडे अकरा कोटी रुपये नफा कसा झाला? ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे या याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केली आहे. ठाकरे कुटुंबाची संपत्ती किती आदित्य ठाकरे यांनी 2019 साली विधानसभा निवडणूक लढवली, तर उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर आमदार म्हणून गेले, त्यामुळे उद्धव ठाकरे कुटुंबाला त्यांच्या संपत्तीची पूर्ण माहिती प्रतिज्ञापत्रातून सादर करावी लागली. या प्रतिज्ञापत्रानुसार ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीवर नजर टाकूयात. उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? जवळपास 125 कोटींची संपत्ती शेअर्समध्ये 22 कोटींची गुंतवणूक उत्पन्नाचं स्त्रोत शेअर्समधून येणारा डिव्हिडंट 1 कोटी 61 लाखांची एफडी मातोश्री आणि मातोश्रीसमोरील दोन घरं बाजार भावानुसार घराची किंमत 52 कोटी कर्जतमध्ये एक फार्म हाऊस 23 लाखांची ज्वेलरी एनएसएसमध्ये 3 लाखांची गुंतवणूक 3 एकर जमीन, भिलवले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड बाजारभावानुसार जमिनीची किंमत 5 कोटी जमीन : मुरशेट, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर बाजारभावानुसार जमिनीची किंमत 14 कोटी बँकेचं कर्ज 4 कोटी रश्मी ठाकरेंची संपत्ती 35 लाखांची एफडी शेअर्स आणि बॉण्डमध्ये 34 कोटींची गुंतवणूक एनएसएसमध्ये 3 लाखांची गुंतवणूक 1 कोटी 35 लाखांची ज्वेलरी जमीन : भिलवले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड जमीन : वैजनाथ, तालुका कर्जे, जिल्हा रायगड जमीन : हुमगाव, तालुका खालापूर, जिल्हा रायगड जमीन : कोरलाई, तालुका मुरूड, जिल्हा रायगड जमिनीची एकूण किंमत 6 कोटी घराची बाजारभावानुसार किंमत 30 कोटी बँकेचं कर्ज 11 कोटी आदित्य ठाकरेंची संपत्ती एफडीमध्ये 10 कोटींची गुंतवणूक शेअर्स आणि बॉण्डमध्ये 20 लाखांची गुंतवणूक 65 लाखांची ज्वेलरी जमीन : बिलावले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड बाजारभावानुसार जमिनीची किंमत 77 लाख रुपये व्यावसायिक इमारत, श्रीजी आर्केड, ठाकुर्ली, कल्याण बाजारभावानुसार किंमत 4 कोटी एनएसएसमधील गुंतवणूक 3 लाख

जाहिरात

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया दरम्यान या याचिकेवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची संपत्ती पाहायची होती, तर दसरा मेळाव्यात दिसली असती. लोकांचं प्रेम आहे तीच आमची संपत्ती आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

  ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, हायकोर्टात याचिका करणाऱ्या गौरी भिडे कोण आहेत?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात