मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संघावर बंदीची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्याला फडणवीसांनी फटकारलं, म्हणाले...

संघावर बंदीची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्याला फडणवीसांनी फटकारलं, म्हणाले...

 असे मुर्खासारखे बोलणारे खूप आहेत. देशात कायदा आहे. संविधान आहे, पुरावे लागतात

असे मुर्खासारखे बोलणारे खूप आहेत. देशात कायदा आहे. संविधान आहे, पुरावे लागतात

असे मुर्खासारखे बोलणारे खूप आहेत. देशात कायदा आहे. संविधान आहे, पुरावे लागतात

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 सप्टेंबर :  'आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करत आहे, पण आरएसएसबाबत एक तरी प्रकार असा पहिला आहे का? त्यामुळे ज्यांच्याकडे अक्कल कमी आहे त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही, असं म्हणत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेत्याला टोला लगावला.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना तसंच या संघटनेशी संलग्न किंवा निगडित असलेल्या सर्व संघटनांवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पाच वर्षांसाठी बंदी घातली. UAPA कायद्यानुसार ही संघटना बेकायदा असल्याचंही केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. या कारवाईबद्दल फडणवीस यांनी माहिती दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याबद्दल काँग्रेस नेत्याने मागणी केली, यावर फडणवीस म्हणाले की, असे मुर्खासारखे बोलणारे खूप आहेत. देशात कायदा आहे. संविधान आहे, पुरावे लागतात. भाजप सत्ता नसलेल्या राज्यात सुद्धा असे कोणतेही प्रकार घडले नाही. भाजप सत्तेत नसताना सुद्धा काहीही पुरावे सापडले नाही. आरएसएसबाबत एक तरी प्रकार असा पहिला आहे का? त्यामुळे ज्यांच्याकडे अक्कल कमी आहे त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही, असं म्हणत फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावला.

'सातत्याने PFI संघटनेबद्दल गुप्तचर संस्थेला माहिती मिळत होती. समाजामध्ये हिंसाचार कसा होईल, याबद्दल प्रयत्न सुरू होते. आपल्याला माहिती आहे की लोक दहशतवादी कृत्य करून देशाचे वातावरण बिघडवत आहेत. काही लोक देशात तेढ निर्माण करण्याचे काम करत होते. त्यात पीएफआय देखील होते. आधी केरळने यांच्यावर बंदी घाला अशी मागणी केली होती त्यानंतर विविध राज्यातून मागणी होत होती, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

(दहशतवादाविरोधात '28 सप्टेंबर'चं कनेक्शन; PFI वरील बंदीचा निर्णय सर्जिकल स्ट्राइकच्याच दिवशी)

'राज्यात देखील या लोकानी विविध ठिकाणी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता. पीएफआय हा एक सायलेंट किलर होता. एक मानवी चेहरा दाखवायचा आणि पाठीमागून कृत्य करायचे. यात वेगवेगळे लोक आहेत त्यांच्या सहभागानुसार कारवाई होईल, असा दावाही फडणवीस यांनी सांगितलं.

(केंद्राने PFI सह या संघटनांना बेकायदेशीर घोषित करत घातली बंदी)

'सातत्याने त्यांच्याकडून हे कृत्य सुरू होते. या सर्व गोष्टीचे पुरावे उपलब्ध आहेत यामुळे केद्र सरकारने बंदी घातली आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Marathi news