मुंबई, 08 ऑगस्ट : महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही काँग्रेसची (congress) नाराजी अजूनही कायम आहे. आता विधान परिषद विरोधी पक्षनेते नियुक्ती प्रकरणावरून काँग्रेस नाराज झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांनी आपल्याशी चर्चा न करताच अंबादास दानवे यांची नियुक्ती केल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेची पुन्हा एकदा मोट बांधत आहे. त्यामुळे सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांच्या जागी तातडीने निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचे नाव देऊन विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लावली आहे. अंबादास दानवे यांच्या निवडीमुळे काँग्रेस नाराज झाली आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते निवड प्रकरणात काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतले नाही, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस पक्षाला उद्धव ठाकरे गटाने विचारले सुद्धा नाही त्यामुळे शिवसेना महाविकास आघाडी आहेत की नाही यावर शंका व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे हे आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करत आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे विधानपरिषद मध्ये विरोधी पक्षनेते आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे विधान परिषदेत शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे. ( गरीबांच्या कल्याणासाठी कायदा मोडला तरी हरकत नाही, नितीन गडकरींचं वक्तव्य ) दरम्यान, ED चं सरकार असैविधांनिक आहे. मुंबई आणि महाराष्ट्र संपवण्यासाठी हे सरकार आलेलं आहे. महाराष्ट्र लुटून सुरत ला वाटण्याचं काम हे सरकार करतं आहे. विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदावर अजूनही काँग्रेसचा दावा आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. हे मंत्रिमंडळ असैविधानिक आहे. राज्यपाल विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूक घेण्याबाबत प्रकरण कोर्टात आहे म्हणायचे. मात्र हे सरकार जाताच त्यांनी भाजपला मदत होईल अशी कृती केली. भाजपमध्ये यादवी माजली आहे. लवकरच मोठा स्फोट होईल, असा दावाही पटोलेंनी केला. ( तुम्हाला प्रवासादरम्यान पाळीव प्राण्यांनाही सोबत घ्यायचंय? या मार्गांचा करा वापर ) पॉलिस्टरचा तिरंगा चीन वरून येतोय. देश विकून देश चालवायचा प्रकार भाजप करत आहे. या सरकारमध्ये घोटाळेबाज मंत्री असल्याने हे सरकार मुंबई महाराष्ट्र लुटून सुरतला दान करत आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







