जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तुम्ही फक्त 'येस सर' म्हणायचं; नितीन गडकरी सरकारी अधिकाऱ्यांनी उद्देशून असं का म्हणाले?

तुम्ही फक्त 'येस सर' म्हणायचं; नितीन गडकरी सरकारी अधिकाऱ्यांनी उद्देशून असं का म्हणाले?

तुम्ही फक्त 'येस सर' म्हणायचं; नितीन गडकरी सरकारी अधिकाऱ्यांनी उद्देशून असं का म्हणाले?

तुम्हाला फक्त ‘येस सर’ म्हणावे लागेल. आम्ही जे सांगतो ते तुम्ही अंमलात आणले पाहिजे. आमच्या मते सरकार चालेल, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 10 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांची कामाची पद्धत आणि त्यांचा स्पष्टवक्तेपणा यासाठी नेहमीच चर्चेत असतात. कुणाचीही पर्वा न करता व्यासपीठावरुन रोखठोक आपलं मत मांडताना नितीन गडकरी यांना अनेकवेळा पाहिलं गेलं आहे. मंगळवारी नितीन गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर आपली भाष्य केलं. सरकार आम्ही चालवतो तुम्ही फक्त ‘येस सर’ म्हणायचं अस सरकारी अधिकाऱ्यांना उद्देशून गडकरी यांनी म्हटलं. नितीन गडकरी आदिवासी विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर सडेतोड भाष्य केलं. सरकार तुमच्याप्रमाणे काम करणार नाही, तुम्ही मंत्र्यांप्रमाणे काम कराल. मी अधिकाऱ्यांना नेहमी सांगतो की, तुम्ही म्हणाल तसे सरकार चालणार नाही, तुम्हाला फक्त ‘येस सर’ म्हणावे लागेल. आम्ही जे सांगतो ते तुम्ही अंमलात आणले पाहिजे. आमच्या मते सरकार चालेल, असं गडकरी यांनी म्हटलं. मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण दोऱ्या कुणाकडे? शिवसेनेचा शिंदेंना सवाल

पुढे नितीन गडकरी यांनी सांगितलं की, खेड्यापाड्यात रस्ते पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मात्र वनविभागाचे अधिकारी कामं होऊच देत नाहीत. 1995 साली मी राज्यात मंत्री असताना अनेक रस्ते, पूल बांधले. पण गडचिरोली आणि मेळघाटमध्ये विकासकामं करताना अनेक अडचणी आल्या. तेथील अनेक गावांना रस्तेच नव्हते. आम्ही खूप प्रयत्न केले, मात्र वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते. याचा खूप त्रास झाला. तरीही मी माझ्या पद्धतीने काम केले.

Bihar : नितीशकुमार आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री!

गरीबांच्या कल्याणासाठी कायदा मोडला तरी हरकत नाही. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांचा दाखला दिला. महात्मा गांधी म्हणायचे की गरीबांच्या कल्याणासाठी कोणताही कायदा आड नाही येऊ शकत. मात्र यात कायदा आड येत असेल तर तो कायदा अनेकदा मोडला तरी काही हरकत नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात