Pet Care Tips: प्रवासादरम्यान पाळीव प्राण्यांनाही सोबत घ्यायचंय? ‘या’ मार्गांचा करा वापर

Pet Care Tips: प्रवासादरम्यान पाळीव प्राण्यांनाही सोबत घ्यायचंय? ‘या’ मार्गांचा करा वापर

How to Travel with Your Pets: आजकाल लोकांना कुत्रा किंवा मांजर पाळायला खूप आवडतं. पण जेव्हा कधी कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी बाहेर जायची वेळ येते, तेव्हा मात्र या प्राण्यांना कुठं ठेवायचं हा प्रश्न नेहमी पडतो.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट: आजकाल लोकांना कुत्रा किंवा मांजर पाळायला खूप आवडतं. लोक त्यांना खूप चांगल्या मनानं घरी आणतात आणि घरातील सदस्याप्रमाणंच त्यांची काळजी घेतात. त्यांच्यासोबत वेळही घालवतात. पण जेव्हा कधी कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी बाहेर जायची वेळ येते, तेव्हा मात्र या प्राण्यांचं काय करायचं आणि त्यांना कुठं ठेवायचं हा प्रश्न नेहमी पडतो. घरात दुसरं कोणी नसताना त्यांना सोबत कसं न्यायचं याचा विचार (How to Travel with Your Pets) पडल्याशिवाय राहत नाही. पण आज आम्ही तुम्हाला तुमच्या कुत्रा किंवा मांजरीला सहलीला कसं घेऊन जाता येऊ शकता याबद्दल सांगणार आहोत.

विमान- जर तुम्ही देशांतर्गत प्रवास करत असाल तर अशावेळी तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांना फ्लाइटमध्ये घेऊन जाऊ शकता. यासाठी तुम्हाला एअरलाइनशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना याची माहिती द्यावी लागेल. यानंतर, काही नियम आणि अटींचे पालन करून तुम्ही तुमचे पाळीव प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता. तुम्हाला तुमच्यासोबत वैद्यकीय प्रमाणपत्रं घेऊन जाणं आवश्यक आहे.

ट्रेन- जर तुम्ही भारतीय ट्रेननं प्रवास करत असाल आणि या काळात तुम्हाला तुमचा कुत्रा किंवा मांजर देखील तुमच्यासोबत घ्यायचं असेल तर ते शक्य आहे. वास्तविक, यासाठी तुम्हाला स्वतःशिवाय तुमच्या पाळीव प्राण्यांसाठी तिकीट घ्यावं लागेल. पार्सलसाठी ज्याप्रमाणे बुकींग करावं लागतं, अशाच पद्धतीने हे तिकीट काढावं लागतं. मग रेल्वेच्या काही अटी आणि नियमांचं पालन करून तुम्ही प्रवास करू शकता. तसेच, जर तुमचा पाळीव प्राणी एक लहान पिल्लू असेल तर तुम्ही ते पिशवीत ठेवू शकता आणि कोचमध्ये तुमच्यासोबत घेऊ शकता. पण पाळीव प्राणी जर मोठे असतील तर ते गार्डच्या डब्याशी जोडलेल्या बॉक्समध्ये ठेवून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतात. फक्त लक्षात ठेवा की, पाळीव प्राण्यांची वैद्यकीय प्रमाणपत्र बाळगण्यास विसरू नका.

हेही वाचा: India@75 : ब्रिटीशांची झोप उडवणाऱ्या ‘या’ 5 महिलांचं कार्य देश कधीच विसरू शकणार नाही

बस- तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांना रोडवेज बसमध्ये देखील नेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या कुत्र्याच्या तोंडावर मास्क लावावा लागेल. प्राणी जर लहान असेल तर त्याला पिशवीत ठेवावं लागेल आणि त्याचंही तिकीट काढावं लागेल आणि त्याची सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रे सोबत ठेवावी लागतील.

कार- याशिवाय तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांना तुमच्या कारमध्ये कुठेही नेऊ शकता. फक्त कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाळीव प्राण्यांसह प्रवेश नाही, हे पाहावं लागेल. पाळीव प्राण्यांसह प्रवास करण्याचा सर्वोत्तम मार्ग स्वत: च्या कारनं केलेला प्रवास असं मानलं जातं. परंतु यासाठीही तुम्ही वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत ठेवा.

Published by: Suraj Sakunde
First published: August 10, 2022, 8:30 AM IST

ताज्या बातम्या