जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मंत्री सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टोचले कान, माफी मागण्याचा आदेश, म्हणाले..

मंत्री सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टोचले कान, माफी मागण्याचा आदेश, म्हणाले..

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 7 नोव्हेंबर : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात तसंच मुंबईतल्या अब्दुल सत्तार यांच्या शासकीय बंगल्याबाहेर आंदोलन केलं. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या या आंदोलनाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्तं झाले. त्यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांना फोन करुन माफी मागण्यास सांगितले. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी जाहिररीत्या माफी मागितली. मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील मंत्री वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येत आहेत. अब्दुल सत्तार यापूर्वीही काही विधानांमुळे वादात सापडले होते. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. ह्या घटना ताज्या असतानाच आज पुन्हा अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला. यामुळे शिंदे गटाची प्रतिमा मलिन होत आहे. या संदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी सर्व मंत्र्यांना शांत राहणे आणि कोणतंही चुकीचं विधान करू नये, असं आवाहन केलं आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आज महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं. वाचा - सुप्रिया सुळेंबाबतच्या विधानानंतर सत्तारांच्या घरावर हल्ला; खिडकीच्या काचा फोडल्या काय म्हणाले अब्दुल सत्तार? ‘महाराष्ट्रामध्ये कोणतीही खळबळ उडाली नाही. मी माझ्याा बोलण्यावर ठाम आहे. जे आम्हाला खोके घेतले म्हणून बदनाम करत आहे, ते XXXचोट आहे. ते मग कुणीही असेल. खोके घेतले अशा शब्दांत जर कुणी टीका करत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. मी जे बोलतोय खरं आहे. तुम्ही एका व्यक्तीचे नाव कशाला घेता. मी सर्वांसाठी बोललो. आता सर्वांसाठी बोललो. तुम्ही एका महिलाबद्दल बोलताय, असं न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीने सांगितलं, तरीही सत्तार म्हणाले की, मी सर्वांसाठी बोललोय. अजून कुणीही बोलेल, ते ज्या भाषेत बोलले, त्याला उत्तर देईन.’

News18लोकमत
News18लोकमत

राष्ट्रवादी आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेस अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावरून आक्रमक झाली आहे. पुढच्या 24 तासांमध्ये अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा राष्ट्रवादीच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर उद्योगमंत्री आणि त्यांचेच सहकारी उदय सामंत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अब्दुल सत्तार यांनी वापरलेल्या शब्दाचं मी समर्थन करत नाही. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात, मात्र अब्दुल सत्तार यांनी टीका करताना चुकीचा शब्द वापरला, असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात