जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सुप्रिया सुळेंबाबतच्या विधानानंतर सत्तारांच्या घरावर हल्ला; खिडकीच्या काचा फोडल्या

सुप्रिया सुळेंबाबतच्या विधानानंतर सत्तारांच्या घरावर हल्ला; खिडकीच्या काचा फोडल्या

सुप्रिया सुळेंबाबतच्या विधानानंतर सत्तारांच्या घरावर हल्ला;

सुप्रिया सुळेंबाबतच्या विधानानंतर सत्तारांच्या घरावर हल्ला;

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या’ अशी टीका कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 7 नोव्हेंबर : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने पक्ष आक्रमक झाले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी आंदोलन करत घरावर हल्ला चढवला. यावेळी अब्दुल सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सत्तारांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण देखील उपस्थित होत्या. दरम्यान, अब्दुल सत्तार यांची 24 तासाच्या आत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रातून दिला आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा : राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणार्‍या मंत्री अब्दुल सत्तार यांची 24 तासाच्या आत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रातून दिला आहे. विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये आपल्या मंत्रीमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. याचा तीव्र निषेध महेश तपासे यांनी केला आहे. वाचा - अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंबाबत वापरले अपशब्द खासदार सुप्रियाताई सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे त्यामुळे तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशारा महेश तपासे यांनी दिला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

काय म्हणाले सत्तार? ‘महाराष्ट्रामध्ये कोणतीही खळबळ उडाली नाही. मी माझ्याा बोलण्यावर ठाम आहे. जे आम्हाला खोके घेतले म्हणून बदनाम करत आहे, ते XXXचोट आहे. ते मग कुणीही असेल. खोके घेतले अशा शब्दांत जर कुणी टीका करत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. मी जे बोलतोय खरं आहे. तुम्ही एका व्यक्तीचे नाव कशाला घेता. मी सर्वांसाठी बोललो. आता सर्वांसाठी बोललो. तुम्ही एका महिलाबद्दल बोलताय, असं न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीने सांगितलं, तरीही सत्तार म्हणाले की, मी सर्वांसाठी बोललोय. अजून कुणीही बोलेल, ते ज्या भाषेत बोलले, त्याला उत्तर देईन.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात