मुंबई, 14 नोव्हेंबर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सलाम बॉम्बे अकॅडमी तर्फे छायाचित्र प्रदर्शन मुंबईतील लोवर परेल येथील वन वर्ल्ड सेंटर भरवण्यात आलं आहे. 14 नोव्हेंबर बालदिना निमित्त या प्रदर्शनाच आयोजन करण्यात आलं आहे. सलाम बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी एक विषय देण्यात आला. बहुरंगी मुंबई असं विषयाचं नाव होतं. या विषयवार 9 वी ते 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांनी छायाचित्र टिपले आहेत. यात मुंबईच जीवन, मुंबईचे पर्यटन, मुंबईतला व्यवसाय इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांनी टिपल्या. यातील 30 छायाचित्र प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. अनेक विद्यार्थी आमच्याकडे फोटोग्राफीचा कोर्स करतात व त्यांना उत्तम प्रशिक्षण कसे देता येईल याकडे आमचा कल असतो. यावर्षी बहुरंगी मुंबई या विषयावर विद्यार्थ्यांनी सुंदर चित्र टिपले आहेत तेच प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. मुंबई सुमारे 1.68 करोड लोकांची वैविध्यपूर्ण जीवनशैली असून सर्वांचे पालनपोषण करते. मुंबई ही सर्व प्रकारच्या लोकांसाठी स्वप्ननगरी आहे. परंतु याठिकाणी सगळ्यांची स्वप्ने पूर्ण होतील असे नाही.
Children’s Day : मुलीसाठी धडपडणाऱ्या बाबाची ‘गोष्ट’, लेकीला करून दिली नव्या जगाची ओळख! Video
यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे इथल्या लोकांना विविध उत्पन्न स्तरावरील मिळणारी संधी. सुमारे 65% लोकसंख्या वस्त्यांमध्ये राहत असल्याने त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठीची पुरेशी संसाधने उपलब्ध नाहीत. ते या मल्टिव्हर्सचा एक भाग आहे. या फोटोग्राफी प्रदर्शनाच्या माध्यमातून सलाम बॉम्बे मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मुंबईचे विविध चित्र दाखवण्यासाठी त्यांच्या लेन्सद्वारे हे सार टिपले आहे, असं सलाम बॉम्बेचे प्रशिक्षक संतोष बोदडे यांनी सांगितले.
Children’s Day : मुलांच्या सुखासाठी माऊलींची तपश्चर्या!, नोकरी सोडून केला अनाथांचा सांभाळ, Video
मीडिया अकादमीव्दारे इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य, संवाद कौशल्य, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, क्रिएटिव्ह रायटींग अशा कौशल्यांचे प्रशिक्षण, ह्या क्षेत्रामधील करिअरची ओळख व मार्गदर्शन दिले जाते. सदर प्रशिक्षणातून विकसीत झालेल्या कौशल्यांना सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येते. फोटोग्राफी क्षेत्रातील नामवंत मास्टर फोटोग्राफर्स विद्यार्थ्यांना विविध सत्रांद्वारे मार्गदर्शन करून व विद्यार्थ्यांनी विविध छायाचित्रांचे प्रकल्प केले आहेत. ते राहत असलेल्या वस्त्यांमध्ये त्यांच्याशी निगडीत विषयाला अनुसरून त्यांनी काढलेली उत्तम छायाचित्रे इतर विद्यार्थ्यांसाठी व प्रेक्षकांसाठी प्रदर्शनामार्फत सादर केली आहेत,असं संतोष बोदडे यांनी सांगितले.