Home /News /maharashtra /

महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; मुंबै बँकेतही सत्तांतर, अध्यक्षपदी प्रवीण दरेकर

महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; मुंबै बँकेतही सत्तांतर, अध्यक्षपदी प्रवीण दरेकर

सहा महिन्यांपूर्वी दरेकर यांना धक्का देत महाविकास आघाडीने बँक ताब्यात घेतली होती. आता सरकार येताच पुन्हा सत्तांतर झालं आहे.

    मुंबई 05 ऑगस्ट : राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीला आता आणखी एक धक्का बसला आहे. मुंबई बँकेतही सत्तांतर झालं असून भाजपचे प्रवीण दरेकर यांची मुंबई बँक अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. नवं सरकार आल्यानंतर मुंबई बँकेमध्येही सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना निवडणुकीत पहिलं यश; सोलापूरमधून ठाकरे गटासाठी आनंदाची बातमी सहा महिन्यांपूर्वी दरेकर यांना धक्का देत महाविकास आघाडीने बँक ताब्यात घेतली होती. आता सरकार येताच पुन्हा सत्तांतर झालं आहे. प्रविण दरेकर यांची गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेवर सत्ता होती. मात्र सहा महिन्यांपूर्वी ती महाविकास आघाडीने खेचून घेतली होती. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: यावेळी निवडणुकीची सूत्रं हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले होते. आता मुंबई बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला होता. तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता अध्यक्षपदी प्रवीण दरेकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. Hasan Mushrif vs Dhanajay Mahadik : खासदार महाडिकांना खासगीत गोकुळ आणि केडीसीसी कारभाराबद्दल सांगेन : हसन मुश्रीफ मुंबै बँकेत एकूण 21 संचालक आहेत. दरेकर हे मजूर म्हणून अपात्र ठरल्यानंतर आता संचालकांची संख्या 20 झाली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी 11 मतं मिळवणारा उमेदवार विजयी ठरतो. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मिळून 10 संचालक आहेत. मात्र, आता राज्यात भाजपची सत्ता असल्यानं मुंबै बँकेचा अध्यक्ष बिनविरोध निवडून आला आहे. कारण राज्यात ज्या पक्षाची सत्ता त्याची मुंबई बँकेवर सत्ता असं समीकरण साधारणत: पहायला मिळतं
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Mumbai, Pravin darekar

    पुढील बातम्या