मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Hasan Mushrif vs Dhanajay Mahadik : खासदार महाडिकांना खासगीत गोकुळ आणि केडीसीसी कारभाराबद्दल सांगेन : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif vs Dhanajay Mahadik : खासदार महाडिकांना खासगीत गोकुळ आणि केडीसीसी कारभाराबद्दल सांगेन : हसन मुश्रीफ

खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. यामुळे जिल्हा बँक आणि गोकुळच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे.

खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. यामुळे जिल्हा बँक आणि गोकुळच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे.

खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. यामुळे जिल्हा बँक आणि गोकुळच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 05 ऑगस्ट : राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर राज्यासह जिल्ह्यांतील राजकारणाची दिशा बदलू लागली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात अशा घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपचे पारडे जड होताना दिसत आहे. राज्यसभेवर नुकतेच निवडूण गेलेले खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील पारंपारिक असलेले विरोधक सतेज पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. (Hasan Mushrif vs Dhanajay Mahadik) यामुळे जिल्हा बँक आणि गोकुळच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे. खासदार महाडिक यांच्या वक्तव्यावर माजी मंत्री मुश्रीफांनी त्यांना उत्तर दिले आहे.

गोकुळमध्ये सत्ता बदलाचा दावा करणारे खा. महाडिक यांना गोकुळमध्ये मी देखील असल्याचा विसर पडला असावा. महाडिक यांची भेट होईल तेव्हा आपण खासगीत दोन्हीही संस्थांच्या आर्थिक प्रगती आणि सभासदाभिमुख कारभाराबाबत समजावून सांगू त्यानंतर ते गोकुळच्या सत्तांतराबाबत यापुढे कधीच उल्लेख करणार नाहीत, असे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली आहे. जिल्हा बँक व गोकुळमधील सत्तांतर अशक्य असल्याचे ते म्हणाले.

हे ही वाचा : सेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना निवडणुकीत पहिलं यश; सोलापूरमधून ठाकरे गटासाठी आनंदाची बातमी

राज्यातील सत्तांतरानंतर गोकुळसह अन्य सहकारी संस्थांमध्ये सत्ताबदल होईल, असा दावा महाडिक करत आहेत. यासंदर्भात विचारले असता मुश्रीफ म्हणाले, महाडिक यांनी गोकुळमधील सत्ताबदलाचा दावा आ. सतेज पाटील यांना नजरेसमोर ठेवून केला असावा. परंतु, गोकुळ व जिल्हा बँक या दोन्हीही संस्थांच्या सत्तांमध्ये हसन मुश्रीफ हा सुद्धा एक घटक आहे, हे कदाचित ते विसरले असतील. राज्यात जरी सत्ता बदल झाला असला, तरी संस्थेतील कार्यकर्ते जिल्ह्यातील आहेत. परके नाहीत. गोकुळ, जिल्हा बँकेत निवडून आलेल्या संचालकांसाठी अनेक सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी खस्ता खालेल्या आहेत. त्यामुळे एकही संचालक या सत्ताबदलाला अनुकूल नसावा.

हे ही वाचा : महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार; काँग्रेस नेत्यांची धरपकड, संजय निरुपम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

बँकेची सत्ता अनेक वर्षे आपल्याकडे आहे.

गोकुळची सत्ता वर्षभरापूर्वीच काँग्रेस व राष्ट्रवादीकडे आलेली आहे. म्हशीच्या दुधाला लिटरला सहा रुपये आणि गायीच्या दुधाला पाच रुपये इतकी दूध दरवाढ केली आहे. वार्षिक उलाढाल तीन हजार कोटी रुपयांनी वाढलेली आहे. दूध पावडरनिर्मितीमध्ये गोकुळला कधीच फायदा होत नव्हता. आमची सत्ता आल्यानंतर वर्षात तब्बल 12 कोटी रुपयांचा फायदा दूध पावडर विक्रीमधून झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही संस्थेत सत्ताबदल होणार नाही, असा ठाम विश्वास आ. मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

First published:

Tags: Kolhapur, कोल्हापूर, हसन मुश्रीफ