मुंबई 17 ऑक्टोबर : मुंबई विमानतळ सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. अनेकदा इथे ड्रग्ज आणि सोन्याची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक केल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशातच आता मुंबई विमानतळावरुन आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई एअरपोर्टवर रिक्षा चालकांची गुंडागर्दी सुरू असल्याचं चित्र समोर आलं आहे.
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सापडलं सोन्याचं घबाड, अधिकारीही झाले अवाक्
या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एअरपोर्ट सुरक्षा रक्षक आणि रिक्षा चालकांमध्ये काहीतरी वाद झाल्याचं पाहायला मिळतं. यात रिक्षा चालक सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करताना दिसत आहे. इतकंच नाही तर रिक्षा चालकाने रात्री मद्यपान करून एअरपोर्ट सुरक्षा रक्षकाला मारहाणही केली आहे. ही घटना तिथेच उपस्थित असलेल्या व्यक्तीने कॅमेऱ्यत कैद केली आहे.
मुंबई विमानतळावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई एअरपोर्टवर रिक्षा चालकांची गुंडागर्दी सुरू असल्याचं चित्र समोर आलं आहे. pic.twitter.com/ldqk6ENfbo
— News18Lokmat (@News18lokmat) October 17, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, हे चित्र फक्त एका दिवसाचं नसून गेले अनेक दिवस रात्री हे चित्र एअरपोर्ट परिसरात सुरु आहे. रात्री येणाऱ्या प्रवाशांकडून इथे असणारे रिक्षा चालक हे अतिरिक्त पैसे घेतात, असा आरोप आहे. आता रिक्षा चालकांच्या दादागिरीचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यामुळे या घटनेनं खळबळ उडाली आहे.
घरात आला आणि मुलाशी बोलत होता, लोकांनी पकडून दिला चोप, भिवंडीतला LIVE VIDEO
मुंबई विमानतळावरुन सोनं जप्त -
तीन दिवसांपूर्वीच मुंबई कस्टम विभागाकडून मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली होती. मुंबई कस्टम विभागाकडून तब्बल 22 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले होते. तर एका खास बेल्टमधून 5 कोटी 20 लाखांचे सोने लपवून नेत असताना कारवाई केली गेली. जप्त करण्यात आलेली रक्कम आणि सोने दुबईहून मुंबईत येत असल्याची माहिती मुंबई कस्टम विभागाकडून माहिती देण्यात आली होती .
दुसऱ्या घटनेमध्ये शारजातून चेन्नईमार्गे मुंबई गाठलेल्या एका व्यक्तीकडून 1 किलो 80 ग्रॅम सोने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले होते. याची किंमत ९९ लाख रुपये इतकी असून हे सोने त्याने त्याच्या अंर्तवस्त्रामध्ये लपविले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airport, Mumbai News, Shocking video viral