भिवंडी, 16 ऑक्टोबर : मुलं चोरण्याच्या अफवांना राज्यामध्ये ऊत आला आहे. या अफवेमुळे निष्पाप लोकांना बेदम मारहाण करण्याच्या घटना घडत आहे. अशीच एक घटना भिवंडीमध्ये घडली आहे. लहान मुलाशी बोलत असल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.
भिवंडी शहरातील निजामपूरा परिसरात ही घटना घडली आहे. एक तरुण घरात शिरून मुलाबरोबर बोलत असल्याने मुलं चोरीच्या संशयावरून तेथील नागरिकांनी त्याला पकडले. त्याचा जाब विचारला पण मुलं चोरीच्या संशय घेत नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला.
भिवंडी : मुलं चोरीच्या संशयावरून एका तरुणाला नागरिकांकडून बेदम मारहाण pic.twitter.com/aXcWFFHjUd
— News18Lokmat (@News18lokmat) October 16, 2022
त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांना बोलावून या तरुणाला ताब्यात देण्यात आले आहे. हा तरुण कोण आहे, कशासाठी आला होता याची चौकशी पोलीस करत आहे.
(तरूणांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारं सेक्स्टॉर्शन असतं काय? पुण्यात घडले हजारो प्रकार)
नोकरीच्या शोधात आलेल्या तरुणाला बेदम मारहाण
काही दिवसांपूर्वीच एका तरुणाला मुलं चोर समजून बेदम मारहाण केल्याची घटना भिवंडी तालुक्यातील पारिवली गावच्या हद्दीत घडली होती. मुलं चोरीच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केली आणि झाडाला बांधून ठेवले होते. त्यानंतर या तरुणा पोलिसांच्या ताब्यात दिले. शंकर नागराव गुंडगुडे असं या तरुणाचं नाव आहे. तो नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील चिखली गावातील राहणारा आहे.
(लातूर : जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीसोबत पत्नीचं संतापजनक कृत्य, प्रियकराच्या मदतीने काटा काढला)
तो कामा शोधात आला होता मात्र पैसे नसल्याने दोन दिवस उपाशी पोटी काम शोधत पारिवाली गावात आला होता. त्याच्यावर मुलं चोरीचा संशय आल्याने आल्याने तेथील मुलांनी त्याला बेदम मारहाण करून झाडाला बांधून ठेवले आणि तालुका पोलिसांना बोलावून ताब्यात दिल्याने हा सर्व प्रकार समोर आला असून पोलिसांनी कोणतीही व्यक्ती संशयास्पद वाटल्यास मारहाण करू नका पोलिसांना कळवा असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news