जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Andheri East Bypoll : शिवसेनेच्या वाघिणीने भाजपला दाखवले आस्मान, ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया....

Andheri East Bypoll : शिवसेनेच्या वाघिणीने भाजपला दाखवले आस्मान, ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया....

Andheri East Bypoll : शिवसेनेच्या वाघिणीने भाजपला दाखवले आस्मान, ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया....

या निवडणुकीत मोठ्या राजकीय नाट्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. पण

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 17 ऑक्टोबर : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये भाजपला माघार घेण्याची मोठी नामुष्की ओढावली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रानंतर भाजपने अखेरीस माघार घेतली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत मोठ्या राजकीय नाट्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. पण, अंधेरीतील वातावरण पाहात  भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी सपशेल माघार घेतली आहे.

सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती, ही निवडणूक बिनविरोध व्हावी. आता ही निवडणूक बिनविरोध होत आहे. राजकीय क्षेत्रातलं मला कळत नाही. राजकीय दबाव वैगेरे आहे की मी सांगू शकत नाही. माझे पती रमेश लटके यांचे सर्वांशी जिव्हाळाचे संबंध होते, त्याची आज पोच पावती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया लटके यांनी दिली. (Andheri East Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात सर्वात मोठी बातमी; भाजपची माघार) दरम्यान, रमेश लटके यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. यानंतर भाजप काय निर्णय घेतं याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अशात आता भाजपने आपला उमेदवार मागे घेत असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवत नसल्याचं भाजपने सांगितलं आहे. (…म्हणून अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिंदे गटाने उमेदवार दिला नाही, उदय सामंतांनी सांगितलं कारण) अंधेरी पूर्वच्या या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत बरेच ट्विस्ट आले. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई महापालिकेत कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला, पण त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. अखेर हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महापालिकेला ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. अशात आता मुरजी पटेल यांनीही माघार घेतली आहे. त्यामुळे आता लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात