मुंबई, 06 नोव्हेंबर : अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एकूण 6 फेरींचा निकाल हाती आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पण, दुसरीकडे इतर उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त लोकांनी पसंती दिली आहे. शिवसेनेनं आरोपही केला होता की, नोटाला पसंती देण्यासाठी पैसे वाटण्यात आले होते. अजून दोन फेरींचा निकाल बाकी आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 32 टक्के मतदान झालं आहे. अंधेरीतल्या गुंदवली महापालिका शाळेमध्ये या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. ऋतुजा लटके या 6व्या फेरीमध्ये 21090 मत घेऊन आघाडीवर आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल - आठवी फेरी ऋतुजा लटके आघाडीवर ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 29033 बाला व्यंकटेश नाडार आपकी अपनी पार्टी - 819 मनोज नायक राईट टू रिकॉल - 458 मीना खेडेकर - 789 फरहाना सय्यद - 628 मिलिंद कांबळे - 358 राजेश त्रिपाठी - 787 नोटा - 5655 एकूण मोजलेली मते - 38527 =========================== सहाव्या फेरीअंती एकूण ऋतुजा लटके - 21090 बाळा नाडार - 674 मनोज नाईक - 398 मीना खेडेकर - 587 फरहान सय्यद - 448 मिलिंद कांबळे - 291 राजेश त्रिपाठी - 621 नोटा - 4338 एकूण - 28447 ======================= पाचव्या फेरीअंती एकूण ऋतुजा लटके - 17278 बाळा नडार - 570 मनोज नाईक - 365 मीना खेडेकर - 516 फरहान सय्यद - 378 मिलिंद कांबळे - 267 राजेश त्रिपाठी - 538 नोटा - 3859 एकूण - 23771 ============================== अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल - चौथी फेरी. (4) ऋतुजा लटके - 14648 बाळा नडार - 505 मनोज नाईक - 332 मीना खेडेकर - 437 फरहान सय्यद - 308 मिलिंद कांबळे - 246 राजेश त्रिपाठी - 492 नोटा - 3580 एकूण - 20548 ========================= महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ - अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत तिसऱ्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते… ऋतुजा लटके- ११३६१ बाला नाडार - ४३२ मनोज नाईक - २०७ मीना खेडेकर- २८१ फरहान सय्यद- २३२ मिलिंद कांबळे- २०२ राजेश त्रिपाठी- ४१० नोटा -२९६७ एकूण मत : १६०९२ =============================== दुसऱ्या फेरीचा निकाल ऋतुजा लटके- 7817 बाला नाडार - 339 मनोज नाईक - 113 मीना खेडेकवर- 185 फरहान सय्यद- 154 मिलिंद कांबळे- 136 राजेश त्रिपाठी- 223 नोटा -1470 ============================ पहिल्या फेरीचा निकाल ऋतुजा लटके- 4277 बाला नाडार - 222 मनोज नाईक - 56 मीना खेडेकवर- 138 फरहान सय्यद- 103 मिलिंद कांबळे- 79 राजेश त्रिपाठी- 127 नोटा -622 एकूण मत : 5624 =========================== या निवडणुकीसाठी 81 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवारांनं माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचं पारडं जड मानलं जातं आहे. (गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, सुषमा अंधारेंचा ‘नटी’ म्हणून उल्लेख) एकूण २५६ मतदान केंद्रांवर, ८१ हजार मतदारांनी हक्क बजावला. मतमोजणी केंद्रावर एकाचवेळी १४ टेबलवर मतमोजणी होत आहे. एका टेबलवर एक EVM मशिन म्हणजे प्रत्येकी १ हजार मतांची मतमोजणी सुरू आहे. एकूण ७० टेबलवर मतमोजणी होणार आहे. भाजपची लढण्याआधीच माघार दरम्यान, अंधेरी पूर्वच्या या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत बरेच ट्विस्ट आले. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई महापालिकेत कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला, पण त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. ( तुम्हीच सांगा साहेब आम्ही फास लावून घ्यायचा का? ऊस वाहतूकदांरानी मांडल्या व्यथा ) अखेर हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महापालिकेला ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. पण अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तशी विनंती केली. त्यानंतर भाजपने आपला उमेदवार मुरजी पटेल यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं. त्यामुळे आता लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







