जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली, या भागांमधील हवा अतिवाईट

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली, या भागांमधील हवा अतिवाईट

फाईल फोटो

फाईल फोटो

मुंबईमध्ये सोमवारी रात्रीपासूनच हवेचा दर्जा खालावला आहे. पुढील दोन दिवस वातावरण असंच राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 09 नोव्हेंबर : मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालावली आहे. सफर इंडेक्सनुसार मुंबईतील अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता अतिवाईट असल्याचं समोर आलं आहे. यामुळे नागरिकांच्या श्वसनाच्या समस्या वाढल्या आहेत. बीकेसी, देवनार आणि विलेपार्ले भागातील हवा सर्वात वाईट असल्याचं समोर आलं आहे. मुंबईमध्ये सोमवारी रात्रीपासूनच हवेचा दर्जा खालावला आहे. पुढील दोन दिवस वातावरण असंच राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या हवेचा वेग मंदावला आहे. परिणामी, वातावरणात प्रदूषके साचून राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुढचे दोन दिवस मुंबईतील हवेत प्रदूषण जाणवणार आहे. Delhi Pollution : PHOTO पाहूनही गुदमरायला होईल; राजधानी दिल्लीतील भयानक वास्तव ठिकाण- AQI कुलाबा - 166 अंधेरी- 198 बी केसी - 253 बोरीवली- 107 देवनार - 226 मुलुंड- 181 मालाड - 141 पवई - 147 विलेपार्ले- 202 वरळी - 147 सायन - 213 तेलंगणातील ‘या’ व्यक्तीनं केली दोन लाख वृक्षांची लागवड; पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित केलं आयुष्य दरम्यान, महाराष्ट्रातील एरोसोल प्रदूषणाचे प्रमाण हे सध्याच्या धोकादायक पातळीवरुन अति धोकादायक पातळीवर जाणार असल्याची शक्यता आहे. कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटने याबाबत अभ्यास केला असून त्यांनी याबाबत इशारा दिला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते वातावरणातील विविध स्तरांमध्ये हवेत वितरीत झालेले धुळीचे कण, धूर, धुके, समुद्री मीठ, सल्फेट, वाळवंटातील धूळ याचं एकत्रित मोजमाप केलं जातं. वातावरणातील विविध लेअर्समध्ये मोजमाप झालेल्या पॅरामीटरला एरोसोल ऑप्टिकल डेप्थ असं म्हणतात. दिल्लीतही प्रदूषण वाढलं - 

हिवाळा सुरू झाला की भारताची राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरू लागतो. या कालावधीत दिल्लीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतं. पंजाब, हरयाणा इथले शेतकरी शेतातील पिकांचे अवशेष किंवा कचरा जाळून त्यांची विल्हेवाट लावतात. गेल्या काही दिवसातील आकडेवारी पाहिली तरी ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये शेतातील आगीची प्रकरणं वाढलेली आहेत. या शेत जाळण्याच्या प्रकरणामुळे दिल्लीतील प्रदूषणही वाढलं आहे. ऑक्टोबर महिन्यात 10 टक्क्यांच्या आत असलेले दिल्लीचं प्रदूषण नोव्हेंबरमध्ये 34 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात